Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Mahamarg: शासकीय वाहनावर अज्ञातांची दगडफेक; ‘११२’ वर तीन वेळा कॉल करूनही २ तास मदत नाही, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पुन्हा थरार! छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी परिसरात थेट शासकीय वाहनावर अज्ञातांची दगडफेक; चालकाच्या सतर्कतेमुळे पाच जणांचे वाचले प्राण... '११२' वर तीन वेळा फोन करूनही २ तास मदत नसल्याचा अधिकाऱ्याचा गंभीर आरोप! पाहा सविस्तर वृत्त!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 11:27 AM
Samruddhi Mahamarg: शासकीय वाहनावर अज्ञातांची दगडफेक; '११२' वर तीन वेळा कॉल करूनही २ तास मदत नाही, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

Samruddhi Mahamarg: शासकीय वाहनावर अज्ञातांची दगडफेक; '११२' वर तीन वेळा कॉल करूनही २ तास मदत नाही, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

Follow Us
Follow Us:
  • कार्यालय अधीक्षक यांच्या शासकीय वाहनावर अज्ञातांची दगडफेक
  • चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; पाचही जण सुखरूप
  • ‘११२’ वर तीनदा कॉल करूनही दोन तास पोलीस मदत न मिळाल्याचा आरोप
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रवासी वाहनांवर दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाच, आता थेट महाराष्ट्र शासनाच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी परिसरात (चॅनेल क्रमांक ४२६) ही घटना घडली असून, या हल्ल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Murder case Update: मित्रावर संशय, पण मास्टरमाइंड निघाली पत्नी! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरले अन् जंगलात…

पुण्याला बैठकीसाठी जाताना वाहनाला केले लक्ष्य

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह वाशिम येथून महत्त्वाची शासकीय कागदपत्रे घेऊन पुण्याला बैठकीसाठी निघाले होते. प्रवासादरम्यान छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी परिसरात चॅनेल क्रमांक ४२६ जवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शासकीय वाहनाला लक्ष्य करत जोरदार दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्यात वाहनाच्या समोरील काच फुटून मोठे नुकसान झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि गाडीतील पाचही प्रवासी सुखरूप बचावले.

‘११२’ वर तीन वेळा कॉल करूनही २ तास प्रतीक्षा; पोलिसांवर गंभीर आरोप

या थरारक घटनेनंतर कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. घटनेनंतर महामार्ग पोलिसांचे पथक २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या ११२ क्रमांकावर तीन वेळा फोन करूनही कोणतीही मदत मिळाली नाही, असा खळबळजनक आरोप राठोड यांनी केला आहे. तब्बल दोन तास घटनास्थळी प्रतीक्षा करूनही संबंधित स्थानिक पोलिसांचे पथक मदतीसाठी पोहोचले नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अखेर पुढील तक्रार नोंदवण्याबाबत आवश्यक सूचना मिळाल्यानंतर राठोड व त्यांचे सहकारी शासकीय बैठकीसाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र, ज्या महामार्गावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात, तेथे थेट शासकीय वाहनावर दगडफेक होणे आणि आपत्कालीन यंत्रणेकडून वेळेत प्रतिसाद न मिळणे, यामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: समृद्धी महामार्गावर कोणत्या अधिकाऱ्याच्या वाहनावर दगडफेक झाली?

    Ans: वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यालय अधीक्षक हिंमत राठोड हे सहकाऱ्यांसह पुण्याला जात असताना त्यांच्या शासकीय वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली.

  • Que: ही घटना नेमकी कुठे घडली आणि यात कोणी जखमी झाले का?

    Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी परिसरात (चॅनेल क्रमांक ४२६) घडली. यात वाहनाची समोरील काच फुटली, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे गाडीतील पाचही जण सुखरूप बचावले.

  • Que: घटनेनंतर हिंमत राठोड यांनी कोणता आरोप केला आहे?

    Ans: महामार्ग पोलीस २० मिनिटांत पोहोचले, मात्र आपत्कालीन '११२' क्रमांकावर तीन वेळा कॉल करून आणि दोन तास प्रतीक्षा करूनही संबंधित पोलीस मदतीसाठी पोहोचले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Samruddhi mahamarg government vehicle chhatrapati sambhajinagar 112 helpline sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Samruddhi Highway
  • samrudhi mahamarg
  • Washim

संबंधित बातम्या

Rohit Pathare case : रोहित पठारे हत्याकांडावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांकडे ‘ही’ मोठी मागणी
1

Rohit Pathare case : रोहित पठारे हत्याकांडावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांकडे ‘ही’ मोठी मागणी

Washim: जल जीवन मिशनचे काम रखडले! मेडशीकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
2

Washim: जल जीवन मिशनचे काम रखडले! मेडशीकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन
4

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.