
500 Workers to Speed Up Pipeline Work, Property Tax Mandatory for New Connections ( पाईपलाईनचे काम वेगवान करण्यासाठी ५०० कामगार; नवीन जोडणीसाठी मालमत्ता कर अनिवार्य ) फोटो सौजन्य AI
उन्हाळ्यापूर्वी ‘नो नेटवर्क’ भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी गॅप क्लोजिंग आणि नळजोडणीची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात आहे. शहरातील १९०० किलोमीटर अंतर्गत पाइपलाइनपैकी आतापर्यंत १३०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आली आहे.
दूषित पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी आणखी १०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिवाळीच्या सुटौमुळे मजूर गावी गेल्याने कामाचा वेग मंदावला होता. आता मजुरांची संख्या वाढवून कामाला गत्ती दिली जाणार आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेतून नळजोडणी देण्यासाठी महापालिकेने अर्ज मागविले आहेत. आतापर्यंत सुमारे सात हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यांचे झोननिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. अर्जासाठी मालमत्ता कर भरणे बंधनकारक आहे. ज्यांच्या मालमत्तेवर अद्याप कर आकारणी झालेली नाही, त्यानी आधी कर आकारणी करून घेणे आवश्यक आहे.
सातारा-देवळाई परिसरातील चार टाक्यामध्ये पाणी घेण्यात आले आहे. या टाक्यांशी संबंधित पाइपलाइनमधील गंध जोडण्याचे काम सुरू असून, प्रत्येक पाइपलाइनवी तपासणी केली जात आहे. ही कामे आव्हानात्मक असल्याने आणखी दीड महिना लागण्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला, टाकीनिहाय गैप क्लोजिंग पूर्ण करून संबंधित भागात पाणीपुरवठा कची सुरू करता येईल, याचे नियोजन केले जात आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून, बालू आर्थिक वर्षात २० नोव्हेंबरपर्यंत ९५ हजार ३४० मालमताधारकांनी कर भरला आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत ९८ कोटी ३० लाख रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, थकबाकीदारांसाठी लागू केलेल्या १०० टक्के शास्ती माफी योजनेचाही नागरिक लाभ घेत आहेत.
आतापर्यंत ३ हजार ८५ थकबाकीदारांनी या योजनेतून ४ कोटी ८६ लाख रुपयांचा कर भरला आहे, महापालिकेच्या मालमता विभागाकडे ३ लाख २७ हजार ४३ मालमतांची नौद आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील सुमारे ५.५० लाख मालमत्ता असल्याचे कचरा संकलन करणान्या खासगी कंपनीच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. नौद असलेल्या मालमतांपैकी केवळ १ लाया ४० हजार मालमत्ताधारक नियमित कर भरतात.