Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रक थांबविणे बाप-लेकाला पडले महागात, भर चौकात बेदम मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

दुचाकीस्वारांच्या आरडाओरडीनंतर ट्रक थांबविणे बाप लेकाला चांगलेच महागात पडले आहे. चौकात आलेल्या तरुणांनी कोणतेही कारण नसताना वडिलांना ट्रकमधून खाली ओढून मारहाण केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 21, 2026 | 11:47 AM
ट्रक थांबविणे बाप-लेकाला पडले महागात, भर चौकात बेदम मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

ट्रक थांबविणे बाप-लेकाला पडले महागात, भर चौकात बेदम मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • ट्रक थांबविल्याच्या कारणावरून हल्ला
  • लोखंडी तव्याने डोक्यात वार
  • मुख्य आरोपी अक्षयला अटक
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीस्वारांच्या आरडाओरडीनंतर ट्रक थांबविणे बाप लेकाला चांगलेच महागात पडले आहे. चौकात आलेल्या तरुणांनी कोणतेही कारण नसताना वडिलांना ट्रकमधून खाली ओढून मारहाण सुरू केली. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या मुलाच्याही डोक्यावर लोखंडी तव्याने तीन ते चार वार केले. त्यानंतर लोखंडी गजाने दोघांनाही बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. पोलिसही माझे काही वाकडे करू शकले नाहीत, अशी मुजोरीची भाषा करीत आरोपींनी धमकीही दिली. मुकुंदवाडीतील एन-२ रोडवर दि.१९ नोव्हेंबर रोजी सकाळी हा प्रकार घडला आहे.

या हल्ल्यातील मुख्य आरोपी अक्षय शिनगारे पाटील असून, त्याच्यासह साथीदाराविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी अक्षयला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, २०२६ मधील खुनाच्या प्रयत्नाचा हा त्याच्याविरुद्धचा तिसरा गुन्हा आहे.

जयभवानीनगर येथील भागवत नारायण भारती (वय ३५) हे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास सुमन अंजली मेडिकलजवळील चौकात वडिलांच्या ट्रकची वाट पाहत होते. त्यांचे वडील ट्रक घेऊन रिक्षा स्टँडजवळ आले असता मोटारसायकलवरून आरडाओरड झाली. त्यामुळे त्यांनी ट्रक थांबवला. मोटारसायकलस्वार निघून गेल्यानंतर तेथे आलेल्या तरुणाने वडिलांना खाली ओढून मारहाण सुरू केली. वडिलांना सोडविण्यासाठी भागवत मध्ये पडताच त्यांनाही मारहाण करण्यात आली.

‘माझे पोलिसही वाकडे करू शकले नाहीत’ 

‘मी अक्षय शिनगारे पाटील आहे, पोलिसही माझे काही वाकडे करू शकले नाहीत; तुला कोणाला सांगायचे ते सांग,’ अशी धमकी देत आरोपीने वडिलांचा मोबाइलही लोखंडी तव्याने फोडला. जखमी बाप-लेकांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी अक्षयला अटक केल्याची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक अजय शितोळे पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या

खुनाच्या प्रयत्नाचा तिसरा गुन्हा

अक्षय शिनगारे पाटील याच्याविरुद्ध २०२६ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत भर चौकात बाप-लेकावर हल्ला करून त्याने पोलिसांनाही आव्हान देणारी भाषा केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाप-लेकावर हल्ला कुठे आणि कधी झाला?

    Ans: छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडीच्या एन-२ रोडवर १९ नोव्हेंबर रोजी सकाळी बाप-लेकावर हल्ला झाला.

  • Que: बाप-लेकावर हल्ला कोणी केला?

    Ans: मुख्य आरोपी अक्षय शिनगारे पाटील असून, त्याच्यासह एका साथीदाराविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: अक्षय शिनगारे पाटीलविरुद्ध कितवा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे?

    Ans: २०२६ मध्ये अक्षयविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: An incident involving the assault of a father and son has taken place in sambhajinagar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट

देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
2

देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या

आधार कार्डचा गैरवापर झाल्याची बतावणी; अटकेची भीती दाखवत महिलेकडून ३० लाख ऑनलाइन उकळले
3

आधार कार्डचा गैरवापर झाल्याची बतावणी; अटकेची भीती दाखवत महिलेकडून ३० लाख ऑनलाइन उकळले

जुने वाद अन् किरकोळ कारणांवरून टोळक्यांचा धुडगूस; पुण्यात तीन घटनांनी खळबळ
4

जुने वाद अन् किरकोळ कारणांवरून टोळक्यांचा धुडगूस; पुण्यात तीन घटनांनी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.