Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pathare case : रोहित पठारे हत्याकांडावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांकडे ‘ही’ मोठी मागणी

रोहित पठारे हत्या प्रकरणाचा तपास समाधानकारक नसल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नवीन एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2026 | 03:12 PM
रोहित पठारे हत्याकांडावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांकडे 'ही' मोठी मागणी

रोहित पठारे हत्याकांडावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांकडे 'ही' मोठी मागणी

Follow Us
Follow Us:
  • रोहित पठारे हत्येने राजकीय वातावरण तापलं
  • पठारे हत्याकांडावरून काँग्रेस आक्रमक
  • हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांकडे मोठी मागणी
संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचा मागास वर्गीय समाजातील तरुण रोहित पठारे याची हत्या ही अत्यंत गंभीर घटना आहे. भाजपाच्या राजवटीत दलित मागासवर्गीय समाज सुरक्षित नाही असे या घटनेवरून दिसत आहे. पोलिसांचे गुन्हेगारांना भय राहिलेले नाही, गृहविभागावर देवेंद्र फडणवीस यांची पकड नाही म्हणून पठारेसारख्या हत्या सातत्याने होत आहेत. रोहित पठारे हत्येचा तपास समाधानकारक नाही, त्यामुळे सध्याची एसआयटी रद्द करून IPS अधिकाऱ्याच्या SIT मार्फत तपास करा, तपास पथकात वैजापूर बाहेरचे अधिकारी व महिला अधिकारी नियुक्त करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रोहित पठारेच्या कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी त्यांच्यासोबत खासदार कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण डोणगावकर, राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यातील खराब कायदा व सुव्यवस्थेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. रोहित पठारेची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे. पठारेची हत्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच विकृत पद्धतीने केली आहे. मराठवाड्यात व राज्यात अशा पद्धतीने होणाऱ्या हत्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. गुंडांची हिम्मत कशी होते, अशा विकृत्त पद्धतीने वागण्याची. राज्यात पोलीस नावाची यंत्रणा राहिलेली नाही, गुंडांना पोलिसांचे भय राहिलेले नाही. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याप्रमाणे पोलिसांचे वर्तन नसून महाराष्ट्र पोलीस खल प्रवृत्तीचे रक्षण करत आहेत, असेच या घटना पाहता दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड हादरले! साने चौक परिसरात धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल! 

सपकाळ पुढे म्हणाले की, रोहित पठारे हत्याप्रकणातील आरोपी गजाआड झाले असले तरी कुटुंबाने दिलेली माहिती व स्थानिक पोलिसांनी केलेली कारवाई यात कुठेही साधर्म्य आढळून येत नाही, तपास योग्य मार्गाने होत नाही. घटनेवेळी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, स्थानिक पोलीसांच्या तपासावर पठारे कुटुंब समाधानी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून तत्काळ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटी गठीत करावी, परिवाराला तपासाबाबत अवगत करावे आणि पठारे कुटुंबाच्या शंकांचे समाधान करावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित पठारे हत्या प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ यांनी काय मागणी केली?

    Ans: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सध्याची एसआयटी रद्द करून आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नवीन एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच तपास पथकात वैजापूरबाहेरील अधिकारी आणि महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

  • Que: रोहित पठारे हत्या प्रकरणातील तपासाबाबत कुटुंबाची भूमिका काय आहे?

    Ans: रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांच्या तपासाबाबत असमाधान व्यक्त केले असून, घटनेपूर्वी पोलिसांकडे तक्रार करूनही योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत काय आरोप केला?

    Ans: राज्यातील खराब कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पोलिसांचे गुन्हेगारांवर नियंत्रण राहिले नसून, दलित आणि मागासवर्गीय समाज सुरक्षित नसल्याचेही त्यांनी म्हटले.

Web Title: Harshvardhan sapkal has taken an aggressive stance regarding the rohit pathare murder case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
1

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप
2

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप

शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 13 दुकाने फोडली; गुन्हे शाखेकडून एकाला अटक
3

शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 13 दुकाने फोडली; गुन्हे शाखेकडून एकाला अटक

घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ
4

घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.