Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरचा ‘वनवास’ संपला! ३३ वर्षांनंतर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी; ४८७ ‘वगळलेले’ भागही समाविष्ट

३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्यास राज्य शासनाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. ४८७ वगळलेल्या भागांसह (EP) आता शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 15, 2026 | 03:14 PM
छत्रपती संभाजीनगरचा 'वनवास' संपला!

छत्रपती संभाजीनगरचा 'वनवास' संपला!

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरचा ‘वनवास’ संपला!
  • ३३ वर्षांनंतर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी
  • ४८७ ‘वगळलेले’ भागही समाविष्ट
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराच्या विकास आराखड्यास अखेर राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे. यासोबतच आराखड्यातून वगळण्यात आलेल्या ४८७ भागांचा ‘एक्सक्लूडेड पोर्शन’ (ईपी) देखील अंतिम करून नगरविकास विभागाने गुरुवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यामुळे शहरातील अनेक प्रलंबित विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहराच्या पुनर्प्रसिद्ध विकास योजनेअंतर्गत मूळ शहर हद्द, वाढीव हद्द, सिडको परिसर, सिडको निधी सूची क्षेत्र, सातारा-देवळाई तसेच चिकलठाणा एमआयडीसी परिसराचा समावेश असलेला विकास आराखडा यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. मात्र काही भाग आराखड्यातून वगळण्यात आल्याने संबंधित नागरिक आणि संस्थांकडून हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या होत्या.

या वगळलेल्या भागांबाबत राज्य शासनाने स्वतंत्र प्रक्रिया राबवून आक्षेप मागविले होते. त्यानुसार ४८७ हरकती दाखल झाल्या. या हरकतींची सुनावणी करण्यासाठी राज्याच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास महिनाभर चाललेल्या सुनावणीनंतर सविस्तर अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला.

एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ३ अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेचा ‘बुलडोझर’; पहाटे मोठी कारवाई

या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने ईपीसह संपूर्ण विकास आराखड्यास अंतिम मंजुरी दिली. गुरुवारी नगरविकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे शहरातील रस्ते, आरक्षणे, नागरी सुविधा, औद्योगिक विस्तार आणि गृहनिर्माण प्रकल्पांना कायदेशीर आधार मिळणार असून विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हरकती आणि मंजुरी…

प्रारूप विकास आराखड्‌यावर नियमानुसार सूचना-हरकती मागवण्यात आल्या. साडेआठ हजारांपेक्षा जास्त सूचना-हरकती प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त झाल्या. त्यांच्या सुनावणीसाठी सरकारने समिती नियुक्त केली. या समितीने सलग एक महिना सुनावणी घेतली आणि त्यानंतर सुधारित प्रारुप विकास आराखडा तयार करुन तो मंजुरीसाठी सरकारला सादर केला. अनेक वर्षभरापासून हा आराखडा शासनाच्या मंजूरीच्या प्रतीक्षेत होता. दरम्यानच्या काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील मोठ्या प्रमाणावर झाडल्या गेल्या. अखेर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याला मंजूरी दिली. आता या आराखड्‌यानुसार शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे.

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू

Web Title: Chhatrapati sambhajinagar development plan final approval government decision released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.