Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साठेबाजांवर कडक नजर! जिल्ह्यातील हॉटेल्समध्ये गॅस सिलिंडरची झाडाझडती; घरगुती गॅस वापरला तर थेट…

गॅस एजन्सीजनंतर आज रविवार, १५ पासून जिल्ह्यातील हॉटेल्समधील गॅस सिलिंडरची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 02:57 PM
साठेबाजांवर कडक नजर! जिल्ह्यातील हॉटेल्समध्ये गॅस सिलिंडरची झाडाझडती (Photo Credit- X)

साठेबाजांवर कडक नजर! जिल्ह्यातील हॉटेल्समध्ये गॅस सिलिंडरची झाडाझडती (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • हॉटेल्समध्ये घरगुती गॅस वापरला तर थेट गुन्हा!
  • संभाजीनगर जिल्हा पुरवठा विभागाची मोठी मोहीम
  • साठेबाजांचे धाबे दणाणले
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर गॅस तुटवड्यावर आळा घालण्यासाठी आणि पुरवठ्यात गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील गॅस एजन्सीजची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. मागील तीन दिवस ही मोहीम चालली. यात ५४ एजन्सी, १९ हॉटेल्सची तपासणी करूनही पथक हात हलवत परतले. कुठेही एकही गैरप्रकार आढळून आला नसून सर्वत्र ‘ऑल इज वेल’ परिस्थिती असल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला…

एकीकडे जिल्हाभरात गॅसवरून हाहाकार माजलेला असताना एकही गैरप्रकार आढळून नये, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, गॅस एजन्सीजनंतर आज रविवार, १५ पासून जिल्ह्यातील हॉटेल्समधील गॅस सिलिंडरची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.

मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅसचा साठा मुबलक असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, एजन्सीवर गर्दा करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात असले तरी वास्तवात नागरिकांमध्ये अनामिक भीती निर्माण झाल्याने गॅससाठी गोंधळ उडत आहे. प्रसंगी सिलिंडर मिळवण्यासाठी बाचाबाची, मारामारीचे प्रकारही घडत आहेत. साठा असूनही दिला जात नाही, दर वाढवून दिले जातात, अशी चर्चा ग्राहकांमध्ये सुरु आहे मात्र, प्रशासनाच्या तपासणीत काहीही आढळले नसल्याने नेमके चित्र काय आहे, यावर प्रश्न निर्माण होत आहे.

मोदी सरकारच्या विरोधात ‘वंचित’चा एल्गार! पुतळा जाळण्यावरून पोलिसांशी झटापट; एपस्टीन फाईलवर केले प्रश्न

एलपीजी गॅस सिलिंडर असूनही न देणे, साठेबाजी करणे, दर वाढवणे किंवा इतर गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील गॅस एजन्सीची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. मागील तीन दिवसांपासून तब्बल ५४ एजन्सी, १९ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. आता आज रविवार, १५ पासून जिल्ह्यातील हॉटेल्सची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार असून या मोहिमेत काही हाती लागेल का ? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आज (शनिवारी) सिल्लोड आणि वैजापूर येथील काही हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. यात काही हॉटेलमध्ये कर्मशियल गॅस सिलिंडरचा स्टॉक आढळून आला मात्र तो जुना स्टॉक असल्याचे हॉटेल चालकाने सांगितल्याने कारवाई केली नाही.

नागरिकांनी माहिती द्यावी

८८ पथकाकडून गॅस एजन्सीच्या तपासण्या करण्यात आल्या, मात्र कुठेही काहीही गैरप्रकार आढळले नाहीत. त्यामुळे कोणावर कारवाई करावी हा प्रश्न आहे. नागरिकांनी देखील पुरवठ्याबद्दल तक्रारी केलेल्या नाहीत. फुलंब्री तालुक्यात दोन एजन्सीबाबत तक्रारी आल्या होत्या, मात्र तपासणीत त्यात तथ्य आढळले नाही. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास किया याविषयी काही माहिती असल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी, आम्ही कारवाई करू.
– प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी

तपासणीत काय पाहणार ?

आजपासून केल्या जाणाऱ्या हॉटेल तपासणीत परवानगीपेक्षा अधिकचा स्टॉक करणे, जास्तीचा स्टॉक असेल तर तो कुठून आणला, तसेच व्यावसायिकऐवजी घरगुती सिलिंडर वापरले जातेय का ? याची तपासणी होणार आहे. यात दोषी आढळल्यास जागेवरच गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली आहे.

मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक

Web Title: Chhatrapati sambhajinagar gas agency inspection no irregularities found by supply dept

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Gas Cylinder

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?
4

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.