Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: पाण्यावरून मनपा प्रशासन धारेवर; प्रशासक काळात नगरसवेकांच्या नावे दाखवलेला निधी गेला कुठे?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ३२२४ कोटींच्या अर्थसंकल्पावर वादळी चर्चा. सातारा-देवळाईसाठी १५० कोटींची मागणी आणि रस्ते रुंदीकरण बाधितांच्या मावेजाचा प्रश्न गाजला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 05, 2026 | 04:28 PM
पाण्यावरून मनपा प्रशासन धारेवर; प्रशासक काळात नगरसवेकांच्या नावे दाखवलेला निधी गेला कुठे?

पाण्यावरून मनपा प्रशासन धारेवर; प्रशासक काळात नगरसवेकांच्या नावे दाखवलेला निधी गेला कुठे?

Follow Us
Follow Us:

 

  • पाण्यावरून मनपा प्रशासन धारेवर
  • प्रशासक काळात नगरसवेकांच्या नावे दाखवलेला निधी गेला कुठे ?
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना शनिवारी झालेल्या बैठकीत शहरातील मूलभूत समस्यांवरून वातावरण तापले. नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, पाणीटंचाई आणि वाहतूक कोंडी यासारख्या प्रश्नांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत ठोस निधीची मागणी लावून धरली. महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी सादर केलेल्या तब्बल ३२२४ कोटींच्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. विविध प्रभागांतील प्रश्न मांडताना सदस्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

अंबिकानगर परिसरातील नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही वाढत असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली. आझाद चौक ते सावरकर चौक दरम्यान बांधकाम साहित्याची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. हा रस्ता करारावर देण्यात आला आहे का, याबाबत प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागण्यात आले. तसेच बीड बायपासवर सिग्नल बसविण्याची मागणी पुढे आली.

सातारा-देवळाईसाठी १५० कोटींची मागणी

सातारा-देवळाई भागातील पाणीटंचाई गंभीर बनली असून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या भागाच्या विकासासाठी किमान १५० कोटींची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.

छ. संभाजीनगर मनपाचा ३,२२४ कोटींचा अर्थसंकल्प; ‘स्वेच्छा निधी’वरून नगरसेवक आक्रमक, प्रशासनावर टीकेची झोड

स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र पथकाची गरज

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता पथक नेमण्याची मागणी करण्यात आली. नियमित देखभाल नसल्याने नागरिकांना गैरसोय होत असल्याचे नमूद करण्यात आले.

बाधितांना तातडीने मावेजा द्या

चिकलठाणा रस्ता रुंदीकरणासाठी परिसरात झालेल्या कारवाईनंतर बाधितांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. सुमारे ५० ते ६० नागरिकांना मावेजा देणे बाकी असून, त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

अर्थसंकल्पावर अंतिम निर्णयाकडे लक्ष

प्राथमिक चर्चेनंतर सदस्यांनी मांडलेल्या मागण्यांचा अंतिम अर्थसंकल्पात कितपत समावेश होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत अर्थसंकल्पात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Sambhaji Nagar 2026: संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal budget discussion satara deolai water fund demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
1

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
4

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.