Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगर मनपाचा ३,२२४ कोटींचा अर्थसंकल्प; ‘स्वेच्छा निधी’वरून नगरसेवक आक्रमक, प्रशासनावर टीकेची झोड

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ३,२२४ कोटींच्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत खडाजंगी. २५ लाखांच्या वॉर्ड निधीवरून नगरसेवक आक्रमक. वाचा सविस्तर अहवाल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 05, 2026 | 04:08 PM
छ. संभाजीनगर मनपाचा ३,२२४ कोटींचा अर्थसंकल्प; 'स्वेच्छा निधी'वरून नगरसेवक आक्रमक (Photo Credit- x)

छ. संभाजीनगर मनपाचा ३,२२४ कोटींचा अर्थसंकल्प; 'स्वेच्छा निधी'वरून नगरसेवक आक्रमक (Photo Credit- x)

Follow Us
Follow Us:

 

  • छ. संभाजीनगर मनपाचा ३,२२४ कोटींचा अर्थसंकल्प
  • ‘स्वेच्छा निधी’वरून नगरसेवक आक्रमक
  • प्रशासनावर टीकेची झोड
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): महापालिकेच्या ३ हजार २२४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीत स्वेच्छा निधीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. वॉर्डनिहाय केवळ २५ लाखांची तरतूद ही वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प असल्याचा आरोप करत सदस्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. नगरसेवकांचा स्वेच्छा निधी अर्थसंकल्पात समाविष्ट करावा, तसेच प्रभागांसाठी भरीव निधी द्यावा, अशी एकमुखी मागणी बैठकीतून पुढे आली.

सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. आयुक्त जी. श्रीकांत यांच्या बदलीमुळे ते अनुपस्थित असले तरी त्यांच्या कार्यकाळातील योजनांचा संदर्भ देत सदस्यांनी प्रशासनाला प्रश्नांनी घेरले. अर्थसंकल्पातील तरतुदींवर मुद्देसूद चर्चा करत अनेक सदस्यांनी स्थानिक समस्यांवर थेट भाष्य केले. भाजपच्या माधुरी अदवंत यांनी स्वेच्छा निधीवरून् प्रशासनाला थेट प्रश्न विचारत, “नगरसेवक नसतानाही स्वेच्छा निधी ठेवला गेला, आता नगरसेवक असताना तो का वगळला ?” असा सवाल उपस्थित केला.

स्थानिक पातळीवरील तातडीच्या कामांसाठी हा निधी अत्यावश्यक असल्याचे सांगत सर्वच सदस्यांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला. प्रभागातील लहान-मोठ्या कामांसाठी नगरसेवकांना स्वतंत्र आर्थिक अधिकार देणे गरजेचे असल्याचा सूर उमटला. बैठकीत भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी चर्चेला सुरुवात करत अर्थसंकल्पातील मर्यादा अधोरेखित केल्या. २५ लाखांत एका वॉर्डाचा विकास शक्य नाही, असे स्पष्ट करत त्यांनी निधी वाढवण्याची मागणी केली. बैठकीत मतीन खान, अर्चना निळकंठ, कमल नरोटे यांनीही विविध स्थानिक प्रश्न मांडले.

महागाईचा मुद्दा ऐरणीवर

वाढत्या महागाईमुळे रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मोठा खर्च येत असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यामुळे वॉर्डनिहाय किमान दुप्पट निधी देण्याची मागणी पुढे आली. वानखेडे यांनी पालिकेच्या आस्थापनेवर होणाऱ्या सुमारे ६०० कोटींच्या खर्चाचा उल्लेख करत, हा खर्च कमी करता येतो का, याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे, असे नमूद केले.

Sambhaji Nagar 2026: संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप

करवसुलीत मोठी क्षमता

भाजपचे सुरेंद्र कुलकर्णी यांनी कर वसुलीत वाढ करण्यावर भर देत, “यंदा वसुली चांगली झाली असली तरी अजून मोठी क्षमता आहे,” असे सांगितले. मोबाईल टॉवर, होर्डिंग, व्यावसायिक आस्थापनांकडून सक्तीने कर वसुली केल्यास पालिकेचे उत्पन्न लक्षणीय वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. कर वसुलीची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी सूचना त्यांनी केली

पाणीपुरवठा योजनेची गती कायम ठेवा

पाणीपुरवठा योजनेचा उल्लेख करत या कामाला मिळालेली गती कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली. आयुक्तांच्या बदलीनंतर काम मंदावू नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे मत व्यक्त झाले. काही सदस्यांनी प्रकल्पाच्या पूर्णतेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याची मागणीही केली.

महिला सुविधा, सोलार व क्रीडा प्रकल्पांवर भर

महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभारणे, सोलार प्रकल्पासाठी अधिक निधी देणे आणि शहरातील क्रीडा सुविधा विकसित करणे या मुद्द्यांवर सदस्यांनी भर दिला. एमआयएमचे अजहर पठाण यांनी गरवारे स्टेडियमसाठी १०० कोटींची तरतूद करण्याची मागणी केली, तर दिव्यांग कल्याण निधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडला.

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal budget standing committee meeting ward fund dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
1

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
4

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.