
तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी (Photo Credit- X)
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी विभागची सूत्रे हाती घेतल्यापासून धडक कारवाया सुरु केल्या आहेत. गुटखा माफियांवर जोरदार कारवाया केल्यानंतर आता हॉटेल, रेस्टोरंट्सकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील ‘एफडीए’ विभागाने कारवाई करत दोषी आढळलेले दोन हॉटेलचे परवाने निलंबित केले आहेत. हॉटेल व्यावसायिकांसह ज्यूस सेंटर, छोटे खानावळी, ठेल्यांवरील फूड सेंटर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वयंपाकगृहातील स्वच्छता, अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक, परवान्यांचे नूतनीकरण नूतनीकरण, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होत आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रत्येक 66 हॉटेलने अन्नसुरक्षा नियमाचे पालन करने का दर्जा आणि गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. असोसिएशनने दिलेल्या एसओपीनुसार काम केल्यास अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. – शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, छत्रपती संभाजनगर हॉटेल असोसिएशन
शहरातील दोन हॉटेल सेंटर आणि एका ज्यूस सेंटरवर कारवाई झाल्यानंतर एफडीएकडून इतर हॉटेलांचीही तपासणी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणाऱ्या आस्थापनांना घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई होऊ शकते.
छत्रपती संभाजीनगर हॉटेल असोसिएशनच्या माहितीनुसार, संभाजीनगर शहरात ३५० हून अधिक लहान-मोठी नोंदणीकृत हॉटेल्स, उपहारगृहे व रेस्टॉरंट्स कार्यरत आहेत. असोसिएशनने सर्व सदस्यांना मानक कार्यपद्धती (एसओपी) उपलब्ध करून दिली आहे. एफडीएच्या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायात शिस्ती वाढली आहे. आगामी काळातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार समोर आल्यानंतर हॉटेलमध्ये जाणाऱ्यांची गर्दी बऱ्याच प्रमाणात ओसरली आहे. कोणते पदार्थ भेसळयुक्त निघेल आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होईल या भीतीने शहरवासीयांनी आपल्या जिभेला मुरड घालत हॉटेलची पायरी चढण्यावर स्वतःलाच लगाम लावून घेतल्याचे चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात आणखी एक तुरा! शहरात उभारले जाणार ‘ॲनिमेशन आणि गेमिंग पार्क’