Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांनी जॅकवेल दुरुस्तीच्या कामातील दिरंगाईवरून संबंधित एजन्सीला कडक शब्दांत फटकारले असून शुक्रवार दुपारपर्यंत पंपिंग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 10, 2026 | 02:24 PM
Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
Follow Us
Follow Us:
  • शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच !
  • कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त
  • एजन्सीला फटकारले
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या जॅकवेल दुरुस्ती आणि पंम्पिंगच्या कामातील दिरंगाईवर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी संबंधित एजन्सी व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पंपिंग सुरू झालेच पाहिजे. यापुढे कोणतीही सबब किंवा विलंब सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जॅकवेलवरील देखभाल-दुरुस्ती, व्हॉल्व बदलण्याचे काम, पंम्पिंगची सद्यस्थिती आणि पुढील नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. बैठकीनंतर संबंधित एजन्सी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि महापालिकेच्या अभियंत्यांनी गुरुवारी सायंकाळीच जॅकवेलवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, रात्रीच नवीन व्हॉल्व बसवून पंम्पिंग सुरू करण्याचा प्रयत्न करावा आणि ते शक्य न झाल्यास शुक्रवारी सूर्योदयापासून काम सुरू करून दुपारी १२ पूर्वी पंम्पिंग सुरू करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले.

रात्रीच नियोजन, दुपारी १२ पूर्वी पंपिंगचे लक्ष्य

बैठकीत एजन्सीच्या प्रतिनिधींनी विलंबाची कारणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर नाराजी व्यक्त करत तुमची डेडलाईन आधीच संपली आहे. आता कारणे नकोत, काम पूर्ण करा, अशा शब्दांत आयुक्तांनी एजन्सीला फटकारले. तसेच एप्रोच चॅनेलचे रखडलेले कामही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी शहरातील निकामी झालेल्या व्हॉल्वची संपूर्ण जबाबदारी संबंधित एजन्सीवरच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नवीन व्हॉल्वची ऑर्डर वेळेत पोहोचण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्हॉल्व उपलब्ध होताच नियोजित शटडाऊन घेऊन पुढील पाच दिवसांत बदलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. बैठकीला विशेष कार्यकारी अधिकारी ए. बी. देशमुख, के. एम. फालक, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता सचिन वाईकर, सर्व कनिष्ठ अभियंते, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार रामधन जाधव, योगेश काळे, जीव्हीपीआरचे सिद्धांत ठाकरे, आशुतोष पांडेय तसेच एमजेपीचे राम नारायण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जॅकवेलवरील कामात आणखी विलंब होऊ नये म्हणून संबंधित एजन्सी, एमजेपी आणि महापालिकेच्या अभियंत्यांनी गुरुवारी रात्रीच आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

डेडलाईन संपली; सबबींना थारा नाही

रात्री काम शक्य न झाल्यास शुक्रवारी सूर्योदयापासून काम सुरू करून सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पंम्पिंग सुरू करणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कामाच्या विलंबाबाबत एजन्सीकडून कारणे मांडली जात असतानाच आयुक्त अमोल येडगे यांनी ती फेटाळून लावत, दिलेली मुदत आधीच संपल्याचे स्पष्ट केले. आता स्पष्टीकरण नव्हे तर प्रत्यक्ष काम पूर्ण होणे महत्त्वाचे असल्याचे सांगत एप्रोच चॅनेलचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

व्हॉल्व बदलण्यासाठी पाच दिवसांची मुदत

नवीन व्हॉल्व उपलब्ध होताच नियोजित शटडाऊन घेऊन पुढील पाच दिवसांत बदलाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील निकामी व्हॉल्वची जबाबदारी संबंधित एजन्सीवरच राहणार असून, नवीन व्हॉल्व वेळेत उपलब्ध होतील यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Web Title: Start pumping by friday without fail commissioner amol yedge furious over the delay in work reprimands the agency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water supply

संबंधित बातम्या

Business Ideas Without Degree: नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मग ‘हे’ ५ बेस्ट बिझनेस आयडियाज जाणून घ्या!
1

Business Ideas Without Degree: नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मग ‘हे’ ५ बेस्ट बिझनेस आयडियाज जाणून घ्या!

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

Satara Water Supply : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
4

Satara Water Supply : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.