Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा प्रकल्पावरून आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सरकारला घेरले. ६७ कोटींचा हा प्रकल्प डम्पिंग ग्राउंड बनल्याच्या आरोपावर मंत्री पंकजा मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 09, 2026 | 02:04 PM
पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक (Photo Credit- X)

पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड?
  • अंबादास दानवे आक्रमक
  • पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): पडेगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून, वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड बनल्याचा आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विधान परिषद सभागृहात केला. या प्रकल्पाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच साठलेला कचरा हटविण्याची मागणी दानवे यांनी राज्य सरकारकडे केली. प्रकल्पाची क्षमता मर्यादित असतानाही मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रचंड ढिगारे निर्माण झाले आहे. कचऱ्यातून मिथेनसह, विषारी वायूंचे उत्सर्जन आणि दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

वारंवार कचऱ्याला आग लागण्याच्या घटनांमुळे वायू प्रदूषणाची समस्याही अधिक गंभीर बनली असल्याचे आ. दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. परिसरातील नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी झाल्याचा दावा चुकीचा असून, त्या भागासाठी स्वतंत्र आरोग्य सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. वायू व जलप्रदूषणाची नियमित तपासणी व्हावी, तसेच लिचेट (कचऱ्यातून तयार होणारा दूषित द्रव) प्रक्रिया यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहे की नाही, याचीही चौकशी करावी.

छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असल्याने परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. कचऱ्याचे वाढते ढिगारे, वारंवार लागणाऱ्या आगी तसेच मिथेनसह विषारी वायूंचे उत्सर्जन यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.… pic.twitter.com/rxRKoMsDvm — Ambadas Danve (@iambadasdanve) July 8, 2026


पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पडेगाव प्रकल्पातील प्रदूषणाचा मोठा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकणे तातडीने थांबवावे, साठलेला कचरा वैज्ञानिक पद्धतीने हटवावा आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली.

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

६७ कोटींचा खर्च पाण्यात, अपेक्षित परिणाम नाही

पडेगाव व चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पांवर शासनाने सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही अपेक्षित परिणाम दिसत नाही. हे पैसे पाण्यात गेल्याचे चित्र आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिक प्रक्रिया आणि इतर उपक्रमांचा कोणताही पारदर्शक हिशेब नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

पालिकेची विशेष बैठक घेणार; दोषींवर कारवाई करणारः मुंडे

प्रश्नाच्या उत्तरात मंत्री पंकजा मुंडे यांनी, या प्रकरणाची निश्चित चौकशी करण्याचे तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात येतील असे सांगितले. महापालिकेने यावर आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे आम्हाला कळविले असल्याचेही त्या म्हणाल्या. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. सध्या दोन ठिकाणी काम व्यवस्थित सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात आपण स्वतः महापालिकेत विशेष बैठक घेणार असून स्वतः स्थळपाहणी देखील करणार आहे. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबतही मंत्री मुंडे यांनी सभागृहात सांगितले.

‘सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो…’; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

Web Title: Ambadas danve slams govt over padegaon garbage project pankaja munde orders inquiry marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Dumping Ground
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
2

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.