
Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाखल
६४९ प्रकरणे निकाली
सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या आमिषाला किवा धमकीला बळी पडू नये. समाजात 4 तेढ निर्माण करणारे किंवा दिशाभूल करणारे संदेश, पोस्ट ४ अथवा टिप्पणी प्रसारित करू नयेत. संशयास्पद प्रकार घडल्यास तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी म्हटले आहे.
जनजागृतीवर पोलिसांचा भर
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याकडून शाळा, महाविद्यालये, विविध संस्था आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. संशयास्पद लिंक, बनावट कॉल, ओटीपी किंवा बैंकिग माहिती कोणालाही देऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले जात आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)