Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ३ अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेचा ‘बुलडोझर’; पहाटे मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ३ अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेने बुलडोझर चालवला आहे. नारेगाव परिसरातील ही कारवाई पहाटे पोलीस बंदोबस्तात पूर्ण करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 14, 2026 | 03:05 PM
एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ३ अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेचा 'बुलडोझर

एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ३ अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेचा 'बुलडोझर

Follow Us
Follow Us:

 

  • एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या ३ अनधिकृत मालमत्तांवर महापालिकेचा ‘बुलडोझर’
  • पहाटे मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगर: नाशिक येथील बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर प्रशासनाने आपला मोर्चा वळवला आहे. महापालिकेने बुधवारी (१३ मे) पहाटे नारेगाव परिसरातील मतीन पटेल यांच्या दोन घरांसह एका कार्यालयावर बुलडोझर चालवून ती अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.

नियोजनबद्ध कारवाई आणि पोलीस छावणीचे स्वरूप

महापालिकेने या कारवाईसाठी अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध तयारी केली होती. बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस फौजफाटा गरवारे स्टेडियम परिसरात जमा झाला होता. साडेपाचच्या सुमारास हे पथक नारेगावकडे रवाना झाले आणि सकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. या मोहिमेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून १ डीसीपी, २ एसीपी आणि ११ पोलीस निरीक्षकांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा

तपासादरम्यान मतीन पटेल यांच्या तीनही मालमत्ता गुंठेवारी न करता आणि कोणतीही रीतसर परवानगी न घेता उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. महापालिकेने यापूर्वी नोटिसा बजावून कारवाईचा इशारा दिला होता. मतीन पटेल यांनी या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने महापालिकेने ही मोठी कारवाई पूर्ण केली.

जमीनदोस्त करण्यात आलेल्या मालमत्ता:

  • मुख्य रस्ता, नारेगाव: २४०० स्क्वेअर फूट जागेवरील घर, ज्यात ६ दुकाने आणि १० खोल्या होत्या.
  • कार्यालय: घराला लागूनच असलेले ३० बाय २० फुटांचे पत्र्याचे शेडमधील कार्यालय.
  • कौसर पार्क: २० बाय ३० आकाराच्या भूखंडावरील दोन मजली घर (येथेच संशयित आरोपीला आश्रय दिल्याचे समोर आले होते).

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू

विरोध नाही, तर फुलांनी स्वागत!

या कारवाईदरम्यान एक अनपेक्षित दृश्य पाहायला मिळाले. मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी कारवाईला विरोध करण्याऐवजी अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांचे फुलांचे हार घालून स्वागत केले. त्यांच्या ६ वर्षांच्या मुलीने अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, अशीच पारदर्शक कारवाई शहरात इतरत्रही व्हावी, अशी मागणी केली.

राजकीय वातावरण तापले

कारवाईची चाहूल लागताच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नारेगाव परिसरात जमा झाले होते. या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

झेडपी सीईओंचा कडक इशारा; शाळा-अंगणवाडीत अस्वच्छता आढळल्यास जागेवरच होणार निलंबन!

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal corporation action against mim corporator matin patel illegal construction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.