
Youth robbed after being falsely accused of selling ganja ( गांजा विकल्याचा खोटा आरोप करून तरुणाला लुटले ) फोटो सौजन्य AI
विशाल रोहीदास जाधव (२२, रा. रमानगर, क्रांती चौक) आणि हितेश बालन्ना यादव (२१, रा. चौसरनगर, प्रतापनगर, उस्मानपुरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. नरेंद्र अशोक बनसोडे (रा. सुतगिरणी चौक) हे ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहानुरमिया दर्गा परिसरात दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी गेले होते. त्यावेळी दोघांनी गांजा विक्रीचा आरोप करत त्यांना मारहाण केली.
अकोला महापालिकेसमोर 262 कोटींच्या करवसुलीचे आव्हान; करावर वाढतोय व्याजाचा बोजा
मोबाईल हिसकावल्यानंतर पासवर्डसाठी छातीत फायटरने मारले. घाबरलेल्या बनसोडे यांच्याकडून फोन पेचा पासवर्ड घेऊन १ हजार ७०० रुपये ट्रान्सफर केले आणि १० हजारांचा मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही कारवाई पोलिस आयुक्त विरेंद्र मिश्र, प्रभारी उपायुक्त (गुन्हे) शर्मिष्ठा वालावलकर आणि सहायक आयुक्त पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, हवालदार संतोष पारधे, दीपक शिंदे, मनोज विखनकर आणि विजय निकम यांच्या पथकाने केली.
पोलिस तपासात हितेश यादव हा उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. तर विशाल जाधव याच्याविरुद्ध यापूर्वी सातारा पोलिस ठाण्यात मारहाणीचा एक गुन्हा दाखल असल्याचेही निष्पन्न झाले. विशालकडून फिर्यादीचा लुटलेला मोबाइलसह दोन मोबाइल जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह