Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Mahamarg Security : समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ? भगदाडांतून गुन्हेगारांची एन्ट्री

Samruddhi Mahamarg Security : समृद्धी महामार्गावरील तुटलेल्या संरक्षण भिंती आणि मोबाइल नेटवर्क नसलेल्या भागांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उणिवांचा फायदा घेऊन गुन्हेगारांकडून लुटमारीच्या घटना घडत असल्याने पोलिस प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 08, 2026 | 02:39 PM
Samruddhi Mahamarg Security ( समृद्धी महामार्ग सुरक्षा )

Samruddhi Mahamarg Security ( समृद्धी महामार्ग सुरक्षा )

Follow Us
Follow Us:
  • सुरक्षा यंत्रणा आणि टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा  
  •  दोष दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना 
  • अडचण दिसताच ११२ वर कळवा 
Samruddhi Mahamarg Security : छत्रपती संभाजीनगरातील समृद्धी महामार्गावरील संरक्षण भिंतींना पडलेली भगदाडे आणि मोबाइल नेटवर्क नसलेल्या भागांचा फायदा घेत गुन्हेगार प्रवाशांना लक्ष्य करीत असल्याचे समोर आले आहे. भिंती तोडून महामार्गावर प्रवेश करायचा, लुटमार करून त्याच मार्गाने पसार व्हायचे, असा प्रकार घडत असल्याने आता या उणिवा दूर करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. तुटलेल्या भिंतींची दुरुस्ती, नो नेटवर्क झोनमध्ये मोबाइल टॉवर आणि आपत्कालीन संपर्कासाठी एसओएस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिली.

सुरक्षा यंत्रणा आणि टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

समृद्धी महामार्गावरील सावंगी इंटरचेंज येथील नियंत्रण कक्षाला अतुलकर यांनी भेट देऊन एमएसआरडीसी, महामार्ग सुरक्षा यंत्रणा आणि टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अडचणी जाणून घेतल्या. महामार्गावरील काही भागांत मोबाइल नेटवर्क नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येत नाही. अशा ठिकाणी मोबाइल कंपन्यांचे टॉवर उभारण्यासह एसओएस लैंडलाइन सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सॉफ्टवेअरमधील हा दोष दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

महामार्गाच्या काही ठिकाणी संरक्षण भिंती तोडल्याने गुन्हेगारांना आत बाहेर जाण्यास मार्ग मिळत आहे. त्यामुळे अशा ठिकाणांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला जाणार आहे. याशिवाय टोलनाक्यावरील फास्टंगवर नोंद असलेला वाहन क्रमांक आणि प्रत्यक्ष वाहनाचा क्रमांक जुळत नसतानाही वाहन सोडले जात असल्याची त्रुटी समोर आली आहे. सॉफ्टवेअरमधील हा दोष दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. विविध यंत्रणांमध्ये संपर्कासाठी समान प्रोटोकॉल नसल्याने वायरलेस यंत्रणेतही सुधारणा करण्यावर भर राहणार आहे.

महामार्गावरील घटनांनंतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीवरून वाद होऊ नये, यासाठी पीडितांनी प्रथम जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. त्यानंतर संबंधित हद्द निश्चित करून गुन्हा वर्ग केला जाईल, असे अतुलकर यांनी स्पष्ट केले.

Amravati News: आंध्रात वादळाचा कहर; १५ जिल्ह्यांत नुकसान! १०,८०५ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले, वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी

अडचण दिसताच ११२ वर कळवा

समृद्धी महामार्गावर अपघात, लुटमार, संशयास्पद हालचाली किया वाहनातील इंधन संपल्याने कोणी अडचणीत असल्याचे दिसल्यास तातडीने ११२ वर संपर्क साधावा. जवळचे पोलिस वाहन मदतीसाठी पोहोचेल. प्रवासादरम्यान आपले लोकेशन कुटुंबीयांना पाठवून ठेवावे, असे आवाहन अतुलकर यांनी केले.

Amravati News: रुग्णसेवेवर राजकीय सावट! रुग्णांची परवड; आमदार निधीतील रुग्णवाहिकेला ‘ब्रेक’

 

Web Title: Samruddhi mahamarg security police action plan mobile towers sos facility sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Accident
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Samrudhi Highway
  • samrudhi mahamarg

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : घाटी मेडिकल कॉलेजचा विस्तार; पीजीच्या ७३ अतिरिक्त जागांना हिरवा कंदील
1

Sambhajinagar News : घाटी मेडिकल कॉलेजचा विस्तार; पीजीच्या ७३ अतिरिक्त जागांना हिरवा कंदील

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा
2

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा

Sambhajinagar Diwali 2026 : बाजारात १० कोटी रुपयांचे फटाके दाखल; किमतीत ३०-४० टक्क्यांनी वाढ
3

Sambhajinagar Diwali 2026 : बाजारात १० कोटी रुपयांचे फटाके दाखल; किमतीत ३०-४० टक्क्यांनी वाढ

Rabi season water schedule 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ! रब्बीला दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन
4

Rabi season water schedule 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ! रब्बीला दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.