Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; ढिलाई आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयाला मध्यरात्री अचानक भेट देत रुग्णसेवेची पाहणी केली. कंत्राटदारांची बिले पडताळणीशिवाय मंजूर केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 08, 2025 | 03:07 PM
मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट (Photo Credi t- X)

मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट (Photo Credi t- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • आरोग्यमंत्र्यांची मध्यरात्री जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट
  • ढिलाई आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा!
  • आहार आणि स्वच्छतेत तडजोड नको
Chhatrapati Sambhajinagar Marathi News: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी शनिवारी मध्यरात्री १ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट देत रुग्णसेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी आपत्कालीन विभाग, स्वच्छता व्यवस्था, औषधसाठा, यंत्रसामग्री आणि विविध विभागांचे कामकाज यांची सविस्तर पाहणी केली.
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पहाटे १:०० वाजता अचानक भेट दिली. रुग्णालयातील आपत्कालीन सेवा, स्वच्छता, औषधसाठा, विभागांचे कामकाज, यंत्रसामग्रीची स्थिती यांची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधून उपचारांची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा, सेवा वेळेवर मिळत आहेत का याची… pic.twitter.com/QewSuNXQb9 — Prakash Abitkar (@abitkar_prakash) December 7, 2025


त्रुटींवरून मंत्री आबिटकर नाराज

पाहणीदरम्यान काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींमुळे मंत्री आबिटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले. रुग्णसेवा अधिक शिस्तबद्ध, सुटसुटीत आणि वेळेवर देण्याची काळजी घ्यावी. रुग्णालयातील आहाराच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. औषधांचा तुटवडा कोणत्याही परिस्थितीत होऊ नये आणि यंत्रसामग्री कार्यरत ठेवावी. माता-प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, लसीकरण मोहीम गतीने राबविणे आणि शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

ढिलाई आढळल्यास कारवाई अपरिहार्य

“रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि तातडीची सेवा मिळालीच पाहिजे. ढिलाई आढळल्यास कारवाई अपरिहार्य आहे,” असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला. यावेळी उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा: CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

खाजगी डॉक्टरांशी संवाद आणि नियमांत शिथिलता

रविवारी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी शहरातील खासगी रुग्णालये आणि शासकीय रुग्णालयांच्या डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. खासगी रुग्णालयांच्या नोंदणी प्रमाणपत्राची वैधता ३ वर्षांवरून ५ वर्ष करण्यात येत आहे. छोट्या रुग्णालयांना फायर ऑडिटमध्ये दिलासा देण्यासाठी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींसंदर्भात लवकरच नगरविकास व प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत चर्चा केली जाईल. प्रशिक्षित नर्सेसंदर्भातील अटीला काही कालावधीसाठी शिथिलता दिली जाईल. ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘ईएसआयसी’ योजनेतील उपचाराचे क्लेमचे पैसे महिनाभरात मिळतील. आरोग्यमंत्र्यांनी खाजगी डॉक्टरांना आवाहन केले की, “तुम्ही आणि आम्ही एकत्र काम केले पाहिजे आणि रुग्णांना माफक दरात सेवा द्यावी.”

कंत्राटदारांच्या बिलांबाबत कठोर इशारा

हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे झालेल्या मराठवाडा परिमंडळस्तरीय आरोग्य आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी प्रशासकीय कामकाजातील त्रुटींवर लक्ष वेधले. शासकीय रुग्णालयांत अस्वच्छता आणि कामातील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. स्वच्छता, लॉन्ड्री व्यवस्था आणि रुग्णांचा आहार यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. “कंत्राटदारांकडून मिळणाऱ्या सेवांची प्रत्यक्ष पडताळणी न करता बिल मंजूर करणे ही चुकीची पद्धत आहे. यापुढे तक्रार आढळल्यास संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यापूर्वी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा त्यांनी दिला.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातून ५ महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास; १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Web Title: Health minister makes surprise visit to district hospital at midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Sukhna River Pollution: पुनर्विकास कामात प्रगती, पण नदीत दूषित पाणी; ‘या’ त्रुटीवर आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी
1

Sukhna River Pollution: पुनर्विकास कामात प्रगती, पण नदीत दूषित पाणी; ‘या’ त्रुटीवर आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

Chhatrapati Sambhajinagarमधील पाच रस्त्यांच्या कामासाठी १५ कोटी रूपये मंजूर; प्रारुप आराखडा प्रक्रिया सुरू
2

Chhatrapati Sambhajinagarमधील पाच रस्त्यांच्या कामासाठी १५ कोटी रूपये मंजूर; प्रारुप आराखडा प्रक्रिया सुरू

CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद
3

CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातून ५ महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास; १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
4

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातून ५ महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास; १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.