छत्रपती संभाजीनगरमधील ५ प्रमुख रस्त्यांसाठी १५ कोटी, 'क्लीन स्ट्रीट ॲप'ला मंजुरी Photo Credit - Ai
अधिकाराऱ्यांची उपस्थित
बैठकीला अध्यक्षा विनीता सिंघल, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे व उल्हास गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, मुख्य वित्तीय अधिकारी उत्तम चव्हाण यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
‘क्लीन स्ट्रीट ॲप’ला मंजुरी
स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘क्लीन स्ट्रीट’ (Clean Street) मोबाइल ॲपला संचालक मंडळाने औपचारिक मंजुरी दिली आहे.
५ प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी १५ कोटी
शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रमुख मार्गाची क्षमता वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने पाच महत्त्वाच्या रस्त्यांच्या व्यापक सुधारणा योजनेसाठी तत्त्वतः मान्यता दिली. या कामांसाठी स्मार्ट सिटी निधीतून अंदाजे १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. महानुभाव आश्रम ते नक्षत्रावाडी (पैठण रोड), सिडको बसस्टँड ते हसूल टी-पॉइंट (जळगाव रोड) यांसह अन्य गर्दीच्या मार्गाचा यात समावेश आहे. संबंधित रस्त्यांसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून कामांना लवकर गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर
संचालक मंडळाच्या या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे शहरातील वाहतूक, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने स्मार्ट सिटी प्रशासनाने महत्त्वाची पाऊले उचलल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा: पुण्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त






