Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank employees’ Strike: बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार! पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँका ठप्प; ६०० कोटींचे व्यवहार रखडले

छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांच्या आठवड्यासाठी लाक्षणिक संप पुकारला. यामुळे शहरात ६०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले असून, प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 29, 2026 | 03:53 PM
बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार! पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँका ठप्प

बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार! पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँका ठप्प

Follow Us
Follow Us:

 

  • बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार!
  • पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँका ठप्प
  • ६०० कोटींचे व्यवहार रखडले
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बैंक युनियन्स (यूएफबीयू) यांच्या वतीने मंगळवार, २७ रोजी बँकांकडून एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या अनुषंगाने पंजाब नॅशनल बँक, अदालत रोड येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. या संपांमुळे सर्व बँकांचे व्यवहार ठप्प झाले असून शहरात सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांचे क्लिअरिंग व्यवहार ठप्प झाले.

यूएफबीयूचे कन्व्हेनर व बँक ऑफ महाराष्ट्रचे कॉ. राजेंद्र देवळे यांनी सूत्रसंचालन केले. एनसीबीचे ललित निकुंभ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे बँक कर्मचारी व अधिकारी शारीरिक व मानसिक तणावाखाली आहेत. सुमारे ८२ टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांना वर्क-लाईफ बॅलन्स नसल्यामुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

SSC HSC Exam 2026 : कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर

पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

यानंतर आयबॉकचे कॉ. सतीश घुगे यांनी परदेशात चार दिवसांच्या आठवड्याबाबत चर्चा सुरू असताना भारतात पाच दिवसांच्या आठवड्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. नोबोचे बैंक ऑफ महाराष्ट्रचे अजय बोरसे व बैंक ऑफ बडोदाचे रवींद्र सुतवणे यांनी पाच दिवसांचा आठवडा आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित राहण्याचे आवाहन केले. यावेळी एसबीआयचे कॉ. राहुल साळुंखे, एमजीबीच्या कॉ. राजश्री वरुडकर, एनसीबीच्या एसबीआयच्या स्वाती चव्हाण तसेच एआयबीओएचे कों, निलेश खरात यांनी घोषणाबाजी करत सभेला पाठिंबा दिला.

आंदोलनाला यश मिळेल..

प्रमुख मार्गदर्शन कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी केले. हा लढा कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी असून आत्तापर्यंत प्रत्येक संघर्षात बँक कर्मचाऱ्यांनी यश मिळवले आहे. या आंदोलनातही यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील टप्प्यात दोन दिवस, तीन दिवस किंवा बेमुदत संपाचा निर्णय शीर्ष नेतृत्व घेईल व त्याची अमलबजावणी कर्मचारी पूर्ण ताकदीने करतील, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात अंदाजे ५०० ते ६०० कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा समारोप पंजाब नॅशनल बँकेचे कॉ. प्रणव कौशिके यांच्या आभार प्रदर्शनाने व जोरदार घोषणाबाजीने झाला.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आदेश; तृतीयपंथीयांच्या तक्रारी सोडवा आणि तातडीने ओळखपत्रे द्या!

Web Title: Bank strike chhatrapati sambhajinagar demand five day week clearing stopped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Bank Employee
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Punjab National Bank

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.