Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेले वादळ; चिकलठाणा विमानतळाचे शेड उडाले, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली!

छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेल्या वादळामुळे चिकलठाणा विमानतळाचे शेड उडून गेले असून ठिकठिकाणी झाडे पडली आहेत. हवामान खात्याने २८ मे पासून मराठवाड्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 26, 2026 | 02:52 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेले वादळ

छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेले वादळ

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेले वादळ
  • चिकलठाणा विमानतळाचे शेड उडाले
  • अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली!
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): यंदा सूर्यदेव कोपल्याचा अनुभव सर्वांनी अनुभवला. महागाई बरोबर दरवाढीचे ‘चटके’ सहन करणाऱ्या संभाजीनगरकरांना सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाने थरकाप उडाला होता. ताशी ६० किमी प्रती किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे चिकलठाणा येथील विमानतळाच्या शेडवरील पने उडून गेल्याची घटना घडली. तर वाऱ्याच्या प्रचंड वेगाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान वादळाबरोबर विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उन्हामुळे हैराण झालेल्या संभाजीनगरकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाच्या व्यवस्थेची लक्तरे उघड झाली असून मान्सूनपूर्व कामे झाली नसल्याचे आले.

शहर आणि परिसरात ४. ८ ते २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिसून दररोज प्रमाणे सकाळपासून उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या संभाजी नगरकरांना दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याचा अनुभव आला. वादळ एवढे तुफान होते की, धुळीमुळे रस्ता दिसेनासा झाला होता. वादळाचा सामना करणे शक्य नसल्याने अनेक वाहनांनी रस्त्याच्या बाजूला थांबून वादळ शांत होण्याची वाट पाहिली. वादळाचा वेग एवढा होता की, या वाऱ्यामुळे चिकलठाणा विमानतळावर असलेले पत्र्याचे शेड कोसळले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. छप्पर उडाले त्यावेळी कुठलेही विमान उड्डाण घेण्याची वेळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

काही भागांत काही काळ वीजपुरवठाही खंडित झाल्याचे नागरिकांनी सांगितले. वादळी वाऱ्यामुळे गारखेडा भागातील पहाडे कॉर्नर व झांबड स्टेट येथील रेणूका माता मंदीर कमानीजवळ असे दोन ठिकाणी दोन झाडे उमळून पडली, तर उल्कानगरी भागात महावितरणच्या डीपीला आग लागल्याची घटना घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत उमळून पडलेली झाडे बाजुला केली. अंदाजे अर्धा तास पावसाने शहराला चिंब केले.

शहर परिसरात ४.८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेचे हवामान सहायक सुनील निकाळजे यांनी दिली. तर एमजीएम विद्यापीठातील वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, विद्यापीठातील हवामान वेधशाळेत सायंकाळी ६ वाजता वाऱ्याचा वेग ४६.३ किमी प्रतितास, गांधेली हवामान वेधशाळेत ६३.३ किमी प्रतितास तर पडेगाव हवामान वेधशाळेत ५१.५ किमी प्रतितास नोंदवला गेला. शहरात अवघे दोन मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती वेधशाळेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. दरम्यान, सोमवार, मंगळवार मान्सूनपूर्व पावसानानंतर उष्णतेत वाढ होईल. तर २८ मे ते ४ जूनपर्यंत संभाजीनगरसह मराठवाड्यात पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचा हजरा राहाल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) वे कृषी हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केला.

संभाजीनगरमध्ये इंधन संकट भीषण! पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर पेट्रोल आले, पण डिझेल संपले; ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदील

Web Title: Heavy storm and pre monsoon rain in chhatrapati sambhajinagar chikalthana airport damaged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • monsoon rains

संबंधित बातम्या

छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही महसूल विभागाचा कारभार संथ
1

छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही महसूल विभागाचा कारभार संथ

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त
2

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त
3

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
4

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.