Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

 मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी हटकल्याचा राग मनात धरून आठ जणांच्या टोळक्याने थेट पोलिसांवरच हल्ला केला आहे. पोलिस अंमलदाराला दोघांनी घट्ट पकडून ठेवले, तर एका तरुणीला याला जिवंत सोडू नको असे म्हणत चिथावणी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2026 | 11:54 AM
गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

Follow Us
Follow Us:
  • गस्तीवर असलेल्या पोलिसावर टोळक्याचा हल्ला
  • तरुणीने चाकूने केले सपासप वार
  • करोडी भागातील घटनेनं खळबळ
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, दररोज वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीच्या गंभीर घटना घडत आहेत. असातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी हटकल्याचा राग मनात धरून आठ जणांच्या टोळक्याने थेट पोलिसांवरच हल्ला केला आहे. पोलिस अंमलदाराला दोघांनी घट्ट पकडून ठेवले, तर एका तरुणीला याला जिवंत सोडू नको असे म्हणत चिथावणी दिली. त्यानंतर तरुणीने चाकूने पोलिस अंमलदाराच्या पाठीवर सपासप पाच वार केले आहेत. डाव्या बरगडीसह दोन्ही हातांवरही वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

 

करोडीतील आंबेडकर चौकात गुरुवारी मध्यरात्री १.१० वाजता हा प्रकार घडला आहे. शाहरुख ऊर्फ जावेद, रोहिणी सुभाष बेळगे, अश्विनी सुभाष बेळगे, सागर संजय इंगळे, अभि गायकवाड, रोहित चव्हाण (सर्व रा. कमळापूर, रांजणगाव) आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सागर इंगळेसह एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फकीरा नब्बास तडवी (३७, रा. पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर) असे जखमी अंमलदाराचे नाव आहे. ते दौलताबाद पोलिस ठाण्यात कार्यरत असून, ७ ऑक्टोबरच्या रात्री अंमलदार गाडे व होमगार्ड नईम यांच्यासह वाहनातून गस्तीवर होते.

हे सुद्धा वाचा : कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…

मध्यरात्री १२.२२ वाजता भांगसीमाता गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या मैदानात तीन महिला व पाच पुरुष आढळले. पोलिसांनी त्यांना रात्रीच्या वेळी तेथे थांबण्याचे कारण विचारून घरी जाण्यास सांगितले. आंबेडकर चौकात चोर आल्याची माहिती मिळाल्याने तडवी पथकासह तेथे गेले. शाहरुख ऊर्फ जावेद व अभि गायकवाड यांनी तडवी यांना पकडून ठेवले आणि अश्विनी बेळगे हिला चाकूने भोसकण्यास चिथावले. त्यानंतर अश्विनीने चाकूने वार केले.

Web Title: An incident has occurred where a group of eight people attacked a police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
1

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
2

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई
3

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
4

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.