Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही महसूल विभागाचा कारभार संथ

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ मालमत्तांच्या ई-फेरफार नोंदी रखडल्या आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या इशाऱ्यानंतरही प्रशासनाचा कारभार संथ असून सर्वाधिक ३,३३० प्रकरणे संभाजीनगर तालुक्यातील आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 12, 2026 | 02:35 PM
छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! (Photo Credit- Ai)

छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:
  • जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या!
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतरही महसूल विभागाचा कारभार संथ
  • वाचा सविस्तर…
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी) : कोणत्याही प्रकारची तक्रार नसली तर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर फेरसाठी अर्ज प्राप्त झाल्यावर किमान ३० दिवसांच्या आता त्या मालमत्तांचे फेरफार होणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यात तब्बल ९ हजार ७६५ मालमत्तेच्या संबंधित ई फेरफार नोंदी रखडल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ३ हजार ३३० नोंदी एकट्या सम्भाजीनगर तालुक्यातील आहेत हे विशेष. कोणत्याही प्रकारची तक्रार नसली तर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर फेरसाठी अर्ज प्राप्त झाल्यावर किमान ३० दिवसांच्या आता त्या मालमत्तांचे फेरफार व्हावे असे नियम आहे. तरीही नोंदणी प्रलंबित राहत असल्याचे चित्र आहे. तलाठीस्तरावरुन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करुन पुढील मंजुरीसाठी मंडळ अधिकारीस्तरातर याबाबतची संचिका सादर केली जाते असे जिल्हा प्रशासनच्या सूत्रांनी सांगितले.

फेरफार नोंद घेण्यासाठी कालावधीनिश्चित केलेला असतानाही जिल्ह्यात अनोंदणीकृत व नोंदणीकृत (अविवादग्रस्त आणि विवादग्रस्त) अशा मालमत्तेच्या मोठया प्रमाणात ई फेरफार नोंदी रखडल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यातील एक महिन्यांहून अधिक कालावधीपासून सुमारे १ हजार २९ प्रकरणांचा समावेश असून उर्वरित प्रकरणे मात्र एका महिन्यांच्या आतील आहे.

‘ई फेरफार एमआयएस’च्या ९ जुलैच्या अहवालानुसार अनोंदणीकृत व नोंदणीकृत (अविवादग्रस्त) च्या एकूण ८ हजार ८६४ फेरफारच्या नोंदी प्रलंबित आहेत. यात एका महिन्याच्या आतील प्रलंबित प्रकरणे ८ हजार ७३६च्या घरात आहेत. तर १ ते ३ महिन्याच्या आतील १२२ फेरफार नोंदी प्रलंबित असून ६ नोंदी ह्या ३ महिन्याहून अधिक दिवसापासून रखडल्या आहेत. तर अनोंदणीकृत व नोंदणीकृत (विवादग्रस्त) प्रकारच्या एकूण ९०१ फेरफार नोंदी प्रलंबित असून यात तीन महिन्याच्या आतील ४३५, तीन ते सहा महिन्याच्या मधील २०५ तर सहा महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून फेरफार नोंदी रखडलेल्या प्रकरणांची संख्या २६१ च्या घरात आहेत. दरम्यान, ई फेरफार नोंदी रखडल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

इशारा देऊनही गती नाही

जिल्हाधिकारीपदी विनय गौडा जी. सी हे रुजू होताच त्यांनी प्रलंबित ई फेरफार नोंदी प्रकरणांची गंभीर दखल घेत तक्रार नसलेले प्रकरण प्रलंबित राहिल्यास कारवाई होईल, असा इशारा दिला होता. एवढेच नव्हे तर तलाठीस्तरावर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित असलेल्या फेरफार बाबत संबंधित तलाठ्क्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचेही निर्देश दिले होते. या इशाऱ्यानंतर यंत्रणा कामाला लागली होती. परंतू त्यास अद्यापही गती देण्याची गरज प्रलंबित प्रकरणाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

तालुकानिहाय एकूण प्रलंबित ई फेरफार नोंदी

अनुक्रमांक तालुक्याचे नाव प्रलंबित ई-फेरफार प्रकरणे (Talukawise Pending Ferfar)
१. छत्रपती संभाजीनगर ३,३३० (सर्वाधिक)
२. गंगापूर १,३२९
३. सिल्लोड १,००३
४. वैजापूर ९८९
५. पैठण ८५२
६. फुलंब्री ५४९
७. खुलताबाद ३५१
८. सोयगाव २५०
९. कन्नड अहवालात समाविष्ट
एकूण संपूर्ण जिल्हा ९,७६५

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त

Web Title: Over 9 thousand e ferfar land records pending in chhatrapati sambhajinagar district marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • property
  • Revenue Department

संबंधित बातम्या

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त
1

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

‘भाईजान… तुस्सी ग्रेट हो!’ सलमानच्या प्रॉपर्टीत वाढ? ‘तो’ फ्लॅट विकला पण नफा मिळवला छ्प्परफाड
2

‘भाईजान… तुस्सी ग्रेट हो!’ सलमानच्या प्रॉपर्टीत वाढ? ‘तो’ फ्लॅट विकला पण नफा मिळवला छ्प्परफाड

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त
3

Chhatrapati Sambhajinagar: डॉनच्या बंगल्यात सापडला पैशांचा डोंगर! 21 तासांची थरारक धाड, सोनं-चांदी आणि हत्यारांचा खजिना जप्त

महाराष्ट्रात खळबळ! उपजिल्हाधिकारी अन् १५ कर्मचाऱ्यांचे निलंबन; महसूलमंत्र्यांची घोषणा, प्रकरण काय?
4

महाराष्ट्रात खळबळ! उपजिल्हाधिकारी अन् १५ कर्मचाऱ्यांचे निलंबन; महसूलमंत्र्यांची घोषणा, प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.