Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही ‘लाडकी बहिणी’तून चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले? तर आता वसूली झाली सुरु, तब्बल 11 कोटी…

१२९१५ महिलांनी २३.२४ कोटी तर १२७५७ सरकारच्या लाडक्या दाजींनी २२.९६ कोटींचा डल्ला मारला होता. तृतीय अन् चतुर्थ श्रेणीच्या महिला कर्मचाऱ्यांनी १८ ते २१ हजार उचलले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 23, 2026 | 12:17 PM
'लाडकी बहीण' योजनेवर काँग्रेसचा महायुती सरकारवर गंभीर आरोप; 38% महिलांना वगळल्याचा दावा, ई-केवायसीवरूनही सवाल

'लाडकी बहीण' योजनेवर काँग्रेसचा महायुती सरकारवर गंभीर आरोप; 38% महिलांना वगळल्याचा दावा, ई-केवायसीवरूनही सवाल

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला होता. अशा बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून 50 टक्के वसुली केली आहे. पण घुसखोर पुरूषांनी लाटलेले २२.९६ कोटींच्या वसुलीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे कुठलेही नियोजन सध्या नाही.

डिसेंबर-२०२५ मधील ई-केवायसी व पडताळणीतून बनावट लाभार्थीचा भंडाफोड झाला होता. बोगस महिला, पुरूष लाभार्थीनी सलग १२ ते १४ महिन्यात ४६.२० कोटींना चुना लावला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्मचारी महिलांकडून वसुलीच्या सूचना दिल्या. १२९१५ महिलांनी २३.२४ कोटी तर १२७५७ सरकारच्या लाडक्या दाजींनी २२.९६ कोटींचा डल्ला मारला होता. तृतीय अन् चतुर्थ श्रेणीच्या महिला कर्मचाऱ्यांनी १८ ते २१ हजार उचलले. या गरीब महिलांच्या पगारातून ११.१२ कोटींची वसुली केली. एक वेतनवाढ रोखण्याचाही निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

14 लाख महिलांची केली नाही केवायसी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा अडीच कोटी महिलांनी अर्ज घेतला होता. यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला होता. अनेक महिला २१ ते ६५ वयोगटात बसत नव्हत्या. अनेक महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त होते त्यांचा लाभ बंद केला आहे.

सरकारी कर्मचारी महिलांना पैसे नाहीत

सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत. एकाच कुटुंबातील फक्त दोन महिला लाभ घेऊ शकतात. तीन ते चार महिलांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांचा लाभ बंद केला आहे. दरम्यान, त्याआधीच १४ लाख महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

लाभार्थीच्या यादीमधून आता पुरुषांची नावे वगळली

लाभ घेतलेल्या पुरुषांची नावे योजनेतून वगळली. पण त्यांच्याकडून वसुलीसंदर्भातील अद्याप कोणतेही पत्र पाठवलेले नाही. बोगस महिला लाभार्थीच्या बाबतीत मात्र कारवाई होत आहे, असे महिला व बालविकास विभागाच्या कक्षाधिकारी संतोष दळवी यांनी म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana : “सरकारकडे पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना बंद करा…; हायकोर्टाने फटकारले

Web Title: Recovery has now begun from those who obtained funds from ladki bahin yojana through improper means

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Government Decision
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
1

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट
2

CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट

मराठी भाषा जतनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, जागतिक मराठी केंद्रालाही गती
3

मराठी भाषा जतनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, जागतिक मराठी केंद्रालाही गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.