Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Water Supply: मुख्य जलवाहिनीच्या चाचणीला ‘विघ्न’; रात्रभर पाणी उपसा करून व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी प्रशासनाची धडपड

छत्रपती संभाजीनगरमधील २५०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिनीच्या चाचणीत तांत्रिक बिघाड. एअरव्हॉल्व्हमधून गळती झाल्याने काम थांबले. मजीप्रा कडून युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 07, 2026 | 03:24 PM
Sambhajinagar Water Supply: मुख्य जलवाहिनीच्या चाचणीला ‘विघ्न’; रात्रभर पाणी उपसा करून व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी प्रशासनाची धडपड
Follow Us
Follow Us:

 

  • मुख्य जलवाहिनीच्या चाचणीला ‘विघ्न’
  • रात्रभर पाणी उपसा करून व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी प्रशासनाची धडपड
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची चाचणी सध्या सुरू असून, रविवारी जॅकवेलमधून पंपिंग करत पाणी फारोळ्यापर्यंत यशस्वीरित्या पोहोचविण्यात आले. मात्र, सोमवारी पुढील टप्प्याच्या सुरु असलेल्या चाचणीदरम्यान तांत्रिक त्रुटीमुळे काम ठप्प झाले. एअरव्हॉल्व्ह बंद न राहिल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन संपूर्ण प्रक्रिया विस्कळीत झाली.

फारोळा येथे बसविण्यात आलेल्या स्क्रोल व्हॉल्व्हमधून पाणी बाहेर आल्यानंतर ते बंद करून पाणी पुढे सोडण्यात आले. यावेळी सहाशे मिमी व्यासाचा एअरव्हॉल्व्ह बंद न केल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडले, जलवाहिनीतून येणाऱ्या प्रचंड दाबामुळे खड्ड्यात पाणी साचून लहान तळ्याचे स्वरूप निर्माण झाले. इतकेच नव्हे, तर संबंधित व्हॉल्व्हही पाण्याखाली गेला. या प्रकारामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) व जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. पाणी उपसण्यासाठी तातडीने पंप यंत्रणा मागवून कार्यान्वित करण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar: बायजीपुरा उपकेंद्रात १० MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित; १५ ते २० हजार वीजग्राहकांना मोठा दिलासा

मात्र, जलवाहिनीतून सतत येणाऱ्या पाण्यामुळे उपसा करतानाही खड्ड्यातील पाण्याची पातळी कमी होत नव्हती. सोमवारी दिवसभर प्रयत्न करूनही परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली नाही. अखेर रात्री उशिरापर्यंत पाणी उपसा करून एअरव्हॉल्व्ह बंद करण्याचे काम सुरू होते. व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद झाल्यानंतरच पुढील चाचणी सुरू करता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुख्य जलवाहिनी प्रकल्पाचा आढावा

जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान उभारण्यात येत असलेली ही जलवाहिनी सुमारे २८ किलोमीटर लांबीची असून, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. २५०० मिमी व्यासाची ही पाइपलाइन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेण्यास सक्षम आहे. सध्या अंतिम चाचण्यांचा टप्पा सुरू असून, किरकोळ तांत्रिक अडचणींमुळे कामात विलंब होत आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर शहरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कडक आदेश; बोगस परवान्यांवर येणार गदा

Web Title: Sambhajinagar water pipeline testing hurdles valve leakage repair updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
1

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
4

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.