Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर महापालिका मालामाल! प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ; वर्षभरात ४.८५ कोटींची कमाई

प्राणिसंग्रहालयातून तब्बल २ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, शहरातील पाच प्रमुख उद्यानांमधून १ कोटी ८६ लाख रुपयांची कमाई झाली आहे. ही माहिती उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 07, 2026 | 03:51 PM
संभाजीनगर महापालिका मालामाल! प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ (Photo Credit- X)

संभाजीनगर महापालिका मालामाल! प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगर महापालिका मालामाल!
  • प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ
  • वर्षभरात ४.८५ कोटींची कमाई
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीगर शहरातील महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयासह प्रमुख उद्यानांनी यंदा उत्पन्नात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. प्राणिसंग्रहालयातून तब्बल २ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, शहरातील पाच प्रमुख उद्यानांमधून १ कोटी ८६ लाख रुपयांची कमाई झाली आहे. ही माहिती उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली. मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. सिंह, वाघ, बिबट्या, हरणे, काळवीट, निलगाय, सांबर, कोल्हा, लांडगा, मगर, शहामृग यांसारख्या सुमारे ३७५ प्राण्यांचे येथे संगोपन केले जाते.

विद्यार्थ्यांच्या सहली, पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्या भेटींमुळे प्राणिसंग्रहालयात सतत वर्दळ असते. विशेषतः सिंह-वाघांच्या डरकाळ्या आणि प्राण्यांच्या हालचाली पाहण्याचा अनुभव पर्यटकांना आकर्षित करतो. नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि प्राण्यांची योग्य निगा यामुळेच तिकीट विक्रीतून मोठे उत्पन्न मिळाले आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ४६.५८ लाख रुपये, तर डिसेंबरमध्ये ४२ लाख रुपये उत्पन्नाची नोंद झाली.

शहरातील प्रमुख विरंगुळा केंद्र म्हणून सिद्धार्थ उद्यानाची ओळख निर्माण झाली आहे. सुट्यांच्या काळात येथे कुटुंबे, विद्यार्थी आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याची साधने, वयोवृद्धांसाठी फेरफटका मारण्याची व्यवस्था, तसेच रंगीत-संगीत कारंजे आणि गौतम बुद्धांचा भव्य पुतळा हे प्रमुख आकर्षण आहेत. याशिवाय, मराठवाडा मुक्तीसंग्राम दालनात इतिहासाची माहिती देण्यात येते. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Sambhajinagar Water Supply: मुख्य जलवाहिनीच्या चाचणीला ‘विघ्न’; रात्रभर पाणी उपसा करून व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी प्रशासनाची धडपड

प्राणिसंग्रहालयाचे वार्षिक उत्पन्न

प्राणिसंग्रहालयाने वर्षभरात २ कोटी ९८ लाख ४१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले, पर्यटकांची वाढती संख्या, सुट्यांतील गर्दी आणि व्यवस्थापनातील सुधारणा यामुळे महसुलात मोठी भर पडली आहे. जानेवारी आणि डिसेंबर महिन्यांमध्ये सर्वाधिक कमाई झाली.

उद्यान विभाग मालामाल

महापालिकेच्या पाच प्रमुख उद्यानांमधून एकूण १ कोटी ८६ लाख ७० हजार रुपयाचे उत्पन्न झाले. त्यामध्ये सिद्धार्थ उद्यान १ कोटी ४५ लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यान – ११.४३ लाख, कमल तलाव – ४९ हजार, बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन १७.६७ लाख, महाराणा प्रतापसिंह उद्यान- १२.०९ लाख

Chhatrapati Sambhajinagar: बायजीपुरा उपकेंद्रात १० MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित; १५ ते २० हजार वीजग्राहकांना मोठा दिलासा

Web Title: Sambhajinagar zoo and gardens record revenue collection annual report 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • zoo

संबंधित बातम्या

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
1

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.