Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Sanjay Shirsat Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही असा एकही दिवस आपला जात नाही, मंत्री शिरसाट म्हणाले, "आम्ही आज ज्या पदावर आहोत, त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाच आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 18, 2025 | 03:04 PM
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक (Photo Credit- X)

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • बाळासाहेब असते तर शिवसेना फुटली नसती
  • थोड्या सत्तेसाठी केलेल्या राजकारणाने तुम्ही कुठे गेलात?
  • शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अत्यंत भावूक मत व्यक्त केले. शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही असा एकही दिवस आपला जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री शिरसाट म्हणाले, “आम्ही आज ज्या पदावर आहोत, त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाच आहे. त्यांनी आम्हाला दिलेले प्रेम आजचा कोणीही राजकारणी देऊ शकत नाही. मुलासारखा सांभाळ करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. देशातील कोणताही नेता त्यांच्या विरोधात चकार शब्द काढत नाही. आज जर ते असते, तर देशात वेगळीच क्रांती झाली असती आणि हिंदुत्वाचा भगवा आणखी डौलाने फडकला असता.”

शिवसेनाप्रमुखांशिवाय दुःख वाटते

बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर शिवसेना फुटलीच नसती, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले. “त्यांचा शब्द अखेरचा शब्द असायचा. त्यामुळे कोणताही कार्यकर्ता त्यापुढे जाऊच शकत नव्हता. शिवसेनाप्रमुख आज नाही याचे दुःख वाटते. ते आज हवे होते. त्यांनी दिलेल्या मार्गावरच आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे मंत्री शिरसाट म्हणाले.

हे देखील वाचा: Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

सत्ता गमावल्याबद्दल ‘उबाठा’वर टीका

शिवसेना फुटल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली. “थोड्याशा सत्तेसाठी तुम्ही (उबाठा) केलेले राजकारण तुम्हाला कुठे घेऊन गेले, ही भावना प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत नाहीत. मात्र, आता या निर्णयापासून माघार नाही, हीच भूमिका शिवसेनेची (शिंदे गट) आहे.”

स्थानिक पातळीवर महायुतीचा निर्णय

आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत बोलताना शिरसाट यांनी महायुतीच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. “स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा, असा तिन्ही नेत्यांचा (शिंदे-फडणवीस-पवार) वरिष्ठ स्तरावर निर्णय झालेला आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. सहा शिवसेनेचे तर भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे शक्यतो आमदारांच्या पातळीवर निर्णय घ्यावा,” असे त्यांनी सांगितले. शिरसाट यांनी आवाहन केले की, “युती होत नसले तर समोरचा आपला शत्रू आहे असे समजून निवडणूक लढवू नये. मैत्रीपूर्ण लढत देऊन नगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकावा.”

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Web Title: Sanjay shirsat emotional on shiv sena chiefs death anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Sanjay Shirsat
  • shivsena

संबंधित बातम्या

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
1

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर
2

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
3

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.