Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smart City Mission Handover: स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प आता महापालिकेच्या ताब्यात; ३० हून अधिक अधिकाऱ्यांकडे सोपवली जबाबदारी

Smart City Mission Handover News: संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीचे प्रकल्प १ मे २०२६ पासून महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहेत. शहर बस, आयसीसीसी आणि इतर प्रकल्पांच्या देखभालीसाठी ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 04, 2026 | 03:08 PM
स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प आता महापालिकेच्या ताब्यात (Photo Credit - X)

स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प आता महापालिकेच्या ताब्यात (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प आता महापालिकेच्या ताब्यात
  • ३० हून अधिक अधिकाऱ्यांकडे सोपवली जबाबदारी
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): केंद्र पुरस्कृत ‘स्मार्ट सिटी मिशन’ची मुदत ३० एप्रिल रोजी संपुष्टात आल्यानंतर शहरातील सर्व सुरू आणि पूर्ण झालेले प्रकल्प १ मे २०२६ पासून अधिकृतपणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. नगरविकास विभागाच्या २१ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या निर्णयानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत उभारलेल्या विविध प्रकल्पांची देखभाल, दुरुस्ती आणि पुढील अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेच्या विविध विभागांवर सोपवण्यात आली आहे. यासाठी ३० हून अधिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कामांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे.

शहर बस सेवा, बस डेपोचे संचालन व देखभाल यासाठी कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, विजय गोरे आणि मोहिनी वारभुवन यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये एन-११ येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्मार्ट स्कूल इमारतींचे व्यवस्थापन विजय गोरे पाहणार आहेत, तर शाळांतील आयटी सुविधा आणि फर्निचरची जबाबदारी उपायुक्त लखीचंद चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी), ई-गव्हर्नन्स प्रणाली आणि आयटीशी संबंधित सर्व प्रकल्पांचे नियंत्रणही चव्हाण यांच्याकडेच सोपवण्यात आले आहे. रस्ते विकास, हेरिटेज संवर्धन आणि स्मार्ट पार्किंगसारख्या पायाभूत सुविधांची जबाबदारी कार्यकारी अभियंता बाळासाहेब शिरसाट यांच्याकडे राहणार आहे.

सफारी पार्कमधील सिव्हिल कामे वसंत भोये पाहणार असून वृक्षारोपणाची जबाबदारी मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. क्रांती चौक परिसरातील सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था, ऐतिहासिक प्रवेशद्वारांवरील रोषणाईची जबाबदारी विद्युत विभागाकडे देण्यात आली आहे. याशिवाय, मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर आणि ‘स्वच्छ रस्ते’ उपक्रमासाठी अमोल कुलकर्णी व नंदकिशोर भोंबे यांची नियुक्ती केली आहे.

Fake Fertilizer Racket: संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश; २६ लाखांचा साठा जप्त, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक

हस्तांतरणाचे निर्देश

स्मार्ट सिटी कार्यालयाकडील सर्व प्रकल्पाच्या संचिका, कागदपत्रे, अभिलेखे आणि संबंधित साहित्य तातडीने महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी हे हस्तांतरण पूर्ण करून अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकरी काय भूमिका घेतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

प्रकल्पांची सातत्यपूर्ण देखभाल महत्तवाची

स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या सुविधांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी नियमित देखभाल आणि कार्यक्षम अंमलबजावणी आवश्यक असत्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना अखंड सेवा मिळावी, यासाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेत देशात अव्वल होणार! पालकमंत्र्यांच्या हस्ते आधुनिक कचरा संकलन व्यवस्थेचा शुभारंभ

Web Title: Smart city projects transferred to chhatrapati sambhajinagar municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Smart City

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.