Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी हृदयद्रावक घटना घडली. १८ वर्षीय तरुणाने डोंगरावरून उडी घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा तोल जाऊन दोघेही दरीत कोसळले. यात दोघांचा मृत्यू झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 02:41 PM
काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं

काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं

Follow Us
Follow Us:
  • मुलाला वाचवताना वडिलांचाही दरीत तोल गेला
  • लेकाच्या मृत्यूच्या धक्क्यात आईनेही घेतला टोकाचा निर्णय
  • संभाजीनगर हादरलं
 

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी (21 ऑगस्ट 2026) अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. १८ वर्षीय तरुणाने डोंगरावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी आई-वडिलांसह स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही दरीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर या धक्कादायक घटनेमुळे आईनेही डोंगरावरून खाली उडी घेतल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल मुरलीधर चांदवडे (१८) हा शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता खवड्या डोंगरावर गेला होता. तो डोंगरावरून खाली उडी घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले.

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

मुलाला समजावण्याचे प्रयत्न

कुणालला वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील तसेच परिसरातील नागरिकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी सुमारे दहा वाजल्यापासून त्याला उडी न घेण्याची विनंती करण्यात येत होती. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, कुणाल कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदवडे पुढे सरसावले. त्यांनी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडील त्याच्यापर्यंत पोहोचत असतानाच कुणालने खाली उडी घेतली.

मुलाला वाचवताना वडिलांचाही तोल गेला

कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात मुरलीधर चांदवडे यांचाही तोल गेला आणि ते दरीत खाली कोसळले. उंचावरून खाली पडल्याने कुणाल आणि त्याचे वडील मुरलीधर चांदवडे यांचा मृत्यू झाला. डोळ्यांसमोर मुलगा आणि पती दरीत कोसळल्याचे पाहून आई संगीता चांदवडे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनीही डोंगरावरून खाली उडी घेतल्याचे समोर आले. यात त्यांचाही मृत्यू झाला.

तिघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ

या घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे या तिघांचा मृत्यू झाला. हे कुटुंब देवळाई-सातारा परिसरातील असल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोरच ही संपूर्ण घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला घातला गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कुणालने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास केला जात आहे.

दिंडोरीत खळबळ! पैशांच्या वादातून तरुणाची निघृण हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Web Title: Chhatrapati sambhajinagar khavdya hill family tragedy son parents die fall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
4

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.