Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajanta Forest Tree Cutting: अजिंठा वनपरिक्षेत्रात कुऱ्हाड सुसाट! अवैध वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास; वनविभागाचे लक्ष्य कुठे?

अजिंठा वनपरिक्षेत्रात तस्करांकडून अवैध वृक्षतोडीचा सपाटा सुरू असून पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. महिनाभरापासून पुराव्यांसह तक्रार करूनही वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वनप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 28, 2025 | 03:32 PM
अजिंठा वनपरिक्षेत्रात कुऱ्हाड सुसाट! (Photo Credit - X)

अजिंठा वनपरिक्षेत्रात कुऱ्हाड सुसाट! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • अजिंठा वनपरिक्षेत्रात वृक्षतोड !
  • अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात
  • वनविभागाने लक्ष देण्याची मागणी
Ajanta Forest Tree Cutting News: निसर्ग वाचवण्यासाठी शासकीय स्तरावर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा मोहिमांचा मोठा गाजावाजा होत असला, तरी अजिंठा वनपरिक्षेत्रात मात्र याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. लाकूड तस्करांनी वनविभागातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून शेकडो वर्षांची जुनी झाडे कापण्याचा सपाटा लावला असून, या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वनप्रेमींकडून केला जात आहे.

तस्करांचे जाळे आणि रात्रीचा ‘खेळ’

मिळालेल्या माहितीनुसार, अजिंठा वनपरिक्षेत्रातील अजिंठा, शिवणा, उडणगाव, अंभई, माडणा, सराटी, हळदा, सवळदबारा आणि जामठी या भागांतील जंगले आणि शेतशिवारांमधील मौल्यवान झाडांची कत्तल केली जात आहे. लाकूड व्यापारी गरीब शेतकऱ्यांना पैशांचे प्रलोभन दाखवून ही झाडे विकत घेतात आणि वनविभागाकडून कोणताही परवाना न घेता रात्रीच्या अंधारात ट्रक भरून लाकडांची वाहतूक परराज्यात केली जात आहे.

पुराव्यांसह तक्रार करूनही प्रशासन ढिम्म

या अवैध वृक्षतोडीविरोधात ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मंगेश सनान्से यांनी मागील महिन्याभरापासून लढा पुकारला आहे. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ वन अधिकारी आणि खुद्द वनमंत्र्यांना लेखी तक्रार देऊन सर्व पुरावे सादर केले आहेत. मात्र, महिना उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “वरिष्ठांनी तातडीने लक्ष देऊन ही लूट थांबवावी,” अशी मागणी सनान्से यांनी केली आहे.

हे देखील वाचा: Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा

‘झाडे लावा’ मोहिमेचा फज्जा!

एकीकडे सरकार वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे हाताशी असलेल्या नैसर्गिक वनसंपदेचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. वन विभाग, पोलीस आणि महसूल विभाग यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने लाकूड तस्करांचे धाडस वाढले आहे. रात्रीच्या वेळी वनविभागाची गस्त नसल्याचा फायदा हे तस्कर घेत असून, पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.

वनप्रेमींच्या प्रमुख मागण्या

अजिंठा वनपरिक्षेत्रात रात्रीच्या वेळी वनविभागाची कडक गस्त सुरू करावी. अवैध वृक्षतोड आणि वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जप्तीची कारवाई व्हावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime : हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य

Web Title: Tree felling in ajanta forest range illegal tree felling endangers the environment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • tree cutting

संबंधित बातम्या

Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा
1

Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा

Chhatrapati Sambhajinagar Crime : हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य
2

Chhatrapati Sambhajinagar Crime : हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव
3

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक
4

Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.