
फेब्रुवारी-मार्चमध्ये लावा ‘निशिगंध’; कमी देखभालीत भरघोस फुलोरा, घरभर पसरलेली ताजेतवानी आनंदाची चाहूल
निशिगंध हे एक कंदवर्गीय फूलझाड असून महाराष्ट्रात गुलछडी या नावाने महत्त्वाचे व्यापारी पीक गणले जाते. फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वैणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा अथवा फुलदांडे फुलदाणीत व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. निशिगंध या फूलपिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. मैदानी भागात, फेब्रुवारी ते मार्च दरम्यान निशिगंध लावण्याचा सर्वोत्तम काळ असतो. लग्न आणि धार्मिक समारंभांसाठी तसेच तेल आणि परफ्यूम उत्पादन उद्योगात या फुलांना जास्त मागणी असते.(फोटो सौजन्य – istock)
जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल
चांगल्या निषेद पिकासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. कृषी तज्ञांच्या मते, ६.५ ते ७.५ दरम्यान पीएच असलेली चिकणमाती माती लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. माती ३० सेमी खोल खणून घ्या. त्यानंतर, प्रति हेक्टर ५०० क्विंटल शेणखत टाकून जमीन तयार केली जाते.
शेतकऱ्यांना ओळीमध्ये कंदाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. ओळीमधील अंतर ३० ते ४० सेमी आणि कंदांमधील अंतर १५ ते २० सेमी असावे.एकरी अंदाजे ४०,००० ते ५०,००० केंद लावले जातात, लागवडीच्या खोलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कंदाची लागवड ५ ते ७ सेमी खोलीवर करावी. यापेक्षा जास्त खोलवर लागवड केल्यास बियाण्याच्या उगवणीत समस्या येऊ शकतात.
तुळशी आणि शमीची झाडे एकत्र ठेवता येतात का? जाणून घ्या वास्तू नियम
लागवड केल्यानंतर सुमारे ८० ते ९५ दिवसांनी झाडांना फुले येण्यास सुरुवात होते. फुले पूर्णपणे विकसित झाल्यावर सकाळी आणि संध्याकाळी काढणी केली जाते. योग्य लागवडीमुळे, शेतकरी प्रति हेक्टर १०० ते १४० क्विंटल ताजी फुले आणि १५० ते १८० क्विंटल कंद काढू शकतात.पिकाचे पोषण करण्यासाठी, प्रति हेक्टर २०० किलो नायट्रोजन, ७५ किलो फॉस्फरस आणि १२५ किलो पोटॅश आवश्यक आहे. सिंचन काळजीपूर्वक करावे, कंद लावताना शेत ओलसर असले पाहिजे, परंतु लागवडीनंतर लगेच सिंचन करू नये. कंद मुळे आणि पाने विकसित होऊ लागल्यावर पहिले सिंचन करावे. सतत फुले येण्यासाठी उगवण झाल्यानंतर दोन महिने जमिनीतील पुरेसा ओलावा राखणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात, आठवड्यातून दोनदा किंवा आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.