Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकारच्या विरोधात ‘वंचित’चा एल्गार! पुतळा जाळण्यावरून पोलिसांशी झटापट; एपस्टीन फाईलवर केले प्रश्न

छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रस्ता रोको केला. एपस्टीन फाईल आणि राफेल करारावरून सरकारवर टीका करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 04:39 PM
मोदी सरकारच्या विरोधात 'वंचित'चा एल्गार! पुतळा जाळण्यावरून पोलिसांशी झटापट

मोदी सरकारच्या विरोधात 'वंचित'चा एल्गार! पुतळा जाळण्यावरून पोलिसांशी झटापट

Follow Us
Follow Us:

 

  • मोदी सरकारच्या विरोधात ‘वंचित’चा एल्गार
  • पुतळा जाळण्यावरून पोलिसांशी झटापट
  • एपस्टीन फाईलवर केले प्रश्न
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. मोदी हटाव, देश बचावच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करत संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याच्या प्रयत्नावरून पोलिस व आंदोलकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पंतप्रधान यांच्या धोरणांवर तीव्र टीका

आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर तीव्र टीका करत अनेक मुद्दे उपस्थित केले. कथित एपस्टीन फाईलमध्ये नाव आल्याच्या आरोपांचा तसेच फ्रान्ससोबत झालेल्या राफेल कराराचा उल्लेख करत सरकारने या विषयांवर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच अमेरिकेसोबत झालेल्या विविध करारांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगळ, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, नगरसेविका करुणा जाधव, पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा शहराध्यक्ष (मध्य) संदीप जाधव, युवा शहराध्यक्ष (पश्चिम) राहुल मकासरे, भावी गवई, प्रवीण जाधव, महिला शहराध्यक्ष साधना पठारे, मिलिंद बोर्डे, अशोक खिल्लारे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, स्थानिक महिला सहभागी झाले होत्या.

एपस्टीन फाईलबाबत स्पष्टीकरणाची मागणी

कथित एपस्टीन फाईल प्रकरणाकडे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दुर्लक्ष कसे केले, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. संबंधित आरोपांबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विविध आंतरराष्ट्रीय करारांबाबत पारदर्शकता ठेवावी, असेही आंदोलकांनी सांगितले.

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा! ७५० शेतकऱ्यांना नोटिसा; धावपट्टी १२ हजार फुटांपर्यंत वाढणार

Web Title: Vanchit bahujan aghadi protest kranti chowk sambhajinagar pm effigy burning tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • PM Narendra Modi
  • Protester
  • Vanchit Aghadi

संबंधित बातम्या

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’
1

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
2

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…
3

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
4

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.