Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेडपी सीईओंचा कडक इशारा; शाळा-अंगणवाडीत अस्वच्छता आढळल्यास जागेवरच होणार निलंबन!

छत्रपती संभाजीनगर झेडपी सीईओ पी. एम. मिन्नु यांनी शाळा-अंगणवाडीत अस्वच्छता आढळल्यास मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांना थेट निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. जाणून घ्या समन्वय सभेतील महत्त्वाचे निर्णय.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 13, 2026 | 07:00 PM
झेडपी सीईओंचा कडक इशारा; शाळा-अंगणवाडीत अस्वच्छता आढळल्यास जागेवरच होणार निलंबन!
Follow Us
Follow Us:

 

  • झेडपी सीईओंचा कडक इशारा
  • शाळा-अंगणवाडीत अस्वच्छता आढळल्यास जागेवरच होणार निलंबन!
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): कार्यालयातील निरुपयोगी गोष्टी काढून टाका. जिल्हा परिषदेमधील तसेच तालुका स्तरावरील पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालयात दैनंदिन स्वच्छता ठेवा. शाळा अंगणवाडीतील आहार निकृष्ट आढळल्यास अस्वच्छता दिसल्यास मदतनीस, पर्यवेक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, मुख्याध्यापक यांना जागेवरच सस्पेंड करण्यात येईल, असा कडक इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिन्नु यांनी दिला आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयात आयोजित समन्वय सभेमध्ये सीईओ मिन्नु बोलत होत्या. सभेत त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात झालेल्या समन्वय सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांच्यासह ‘एमआरइझीएस’, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, महिला व बालविकास विभाग, पाणीपुरवठा विभागप्रमुखांसह, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सीईओ यांनी वेळेबाबत आणि स्वच्छतेवर अधिक भर देत, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळण्याचे आवाहन केले. आपल्या कार्यालयात, परिसरात कायमस्वरूपी स्वच्छता ठेवावी. तुम्ही कार्यालयात असताना सर्वांना भेटून त्यांच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे. फिल्डवर असाल तर तसे नोंदवहीत नोंद करून ठेवा. गंगापूर, वैजापूर पंचायत समिती तसेच शिक्षण विभागात स्वच्छता व नीटनेटकेपणा दिसला नाही त्यामुळे, फायली अब क ड वर्गीकरण तसेच कालवा झालेल्या फायलींचा निपटारा, पंचनामा करून त्याचे निर्लेखन करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

झेडपी, पंचायत समितीत येणारा सामान्य माणूस तसेच पदाधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करून समन्वयाने काम करा. काही अडचणी आल्यास आपापल्या विभाग प्रमुखांना तसेच मला कळवा. लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य अन्य लोकप्रतिनिधी तसेच सामान्य माणसाच्या पत्रावर सात दिवसात उत्तर देण्याबाबतही त्यांनी सूचित केले. यावेळी सीईओ यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना सांगितल्या. जिल्ह्यातील घरकुलाची कामे करून घेण्यासाठी एसडीएम, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी समन्वय साधून गायरान जमिनीचे नियमितीकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावे. रोहयोची कामे तसेच मातोश्री पानंद रस्ते, वृक्ष लागवड, नाला सरळीकरण तसेच अन्य कामे दोन दिवसात संपवा. मान्सूनपूर्व खोलीकरण करण्यासाठी गाळमुक्त अभियान लोकसहभागातून प्रत्येक तालुक्यात किमान २५ ग्रामपंचायतीमध्ये ही कामे होणे अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या. मंत्री ग्राम समृद्ध योजनेसह अन्य योजना तात्काळ मार्गे लावा, असेही त्या म्हणाल्या.

विभागप्रमुखांसोबत चाय पे चर्चा करा

तालुकास्तरावर दर मंगळवारी गटविकास अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुकास्तरीय विभाग प्रमुखांसोबत चहाच्या निमित्ताने चर्चा करा, जेणेकरून कामे लवकर होतील. तालुकास्तरावर आदेश काढून शाळा अंगणवाडी या ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय केंद्र उपकेंद्र या ठिकाणी वारंवार विजिट करून स्वच्छतेचा तसेच सर्व विषयांचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

ग्रा.पं.च्या १० टक्के उत्पन्नातून ही कामे करा

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या सर्व ठिकाणी नीटनेटके आणि चालू अवस्थेतील शौचालय त्याचा वापर तसेच तेथे वापरण्याच्या व पिण्याच्या पाण्याची पुरेपूर व्यवस्था, मुला-मुलींच्या शौचालयातील दरवाजे, स्वच्छता नीट नसतील तर स्वच्छ करा.

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Web Title: Zp ceo pm minnu warns suspension for unclean schools anganwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
1

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका
2

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
3

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
4

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.