Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

पुणे महापालिकेने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 17, 2026 | 05:08 PM
Pune : महाराष्ट्रात 'कर्करोग ग्रीड' तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Pune : महाराष्ट्रात 'कर्करोग ग्रीड' तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:

पुणे/ आकाश ढुमेपाटील : राज्यात कर्करोगाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘कर्करोग ग्रीड’ तयार करण्यात येत आहे. पुणे महापालिकेने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

पुणे महानगरपालिका आणि ‘ आपुलकी’ हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्करोगाच्या उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही करावा लागतो. हीच बाब लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे. महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे.

राज्यभरातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि समन्वयित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी कर्करोग ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी दरामध्ये पुणे महापालिकेने सुरू केलेल्या या रुग्णालयामध्ये उपचार मिळणार असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाचे आणि संबंधित संस्थेचे कौतुक केले. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाने यांच्या पुढाकारातून हे रुग्णालय सुरू करण्यात आल्याचे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.

नक्की कोठे आहे रुग्णालय?

बाणेर येथे सुमारे एक एकर महापालिकेच्या जागेत हे उभारण्यात आले आहे. हा १६५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये पुणे महापालिकेने १४ कोटी रुपयांची जमीन उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित गुंतवणूक, व्यवस्थापन आणि कर्मचारी खर्चाची जबाबदारी संबंधित संस्था म्हणजेच अपुलकी मेडिकल केअर सेंटर पार पाडणार आहे. हा देशातील कोणत्याही महानगरपालिकेचा पहिला पीपीपी मॉडेल कर्करोग सेंटर असल्याचे विशेष नमूद केले जात आहे. सुमारे १५० खाटांची क्षमता या रुग्णालयाची आहे.

हे सुद्धा वाचा : घरचे तज्ज्ञ असताना सल्लागार कशाला? पुणे महापालिकेत 30 हून अधिक सल्लागारांवर 32 कोटींहून अधिक खर्च

छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे अनावरण

पुणे महानगरपालिकेच्या वतीने शिवाजीनगर येथील संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या १० फूट उंचीच्या भव्य कांस्य शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ रचतानाच्या रूपातील हे जगातील पहिलेच शिल्प आहे. सुमारे ५ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी लिहिलेले ९ निवडक श्लोक १० भव्य दगडी भिंतींवर मराठी व इंग्रजी अर्थासह कोरण्यात आले आहेत. शिल्पाच्या परिसरात आकर्षक कारंजे, शोभीवंत झाडे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणून त्यातून नागरिकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे देदीप्यमान शिल्प उभारण्यात आले आहे.

Web Title: Chief minister devendra fadnavis has announced that a cancer grid will be created in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.