Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना फटकारले. 'रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत‌', असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2025 | 05:52 PM
सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही...; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही...; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

Follow Us
Close
Follow Us:
  • फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीची आत्महत्या
  • रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर विरोधकांकडून आरोप
  • मुख्यमंत्री फडणविसांनी भाषणातून दिली प्रतिक्रीया

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. तरुणीने सुसाईड नोटमधून पोलीस उपनिरीक्षकासह एका तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही आरोप केले जात आहेत. यावरुन फलटण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना फटकारले. ‘रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत‌’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख केला. आज ज्या प्रचंड आणि अतिविशाल कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केले आहे, फलटणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष केला ते आमचे मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, असा उल्लेख फडणवीसांनी केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आज मी इथे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

परवा आमची एका लहान बहीण डॉ. संपदा मुंडे यांचा अतिश्य दुर्दैवी मृत्यू झाला, त्या भगिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारणही आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत, त्यांना अटक केली आहे. त्यामधील जवळपास सगळं सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा निर्णय आम्ही घेतला, असे फडणवीस यांनी सांगितले.

निबांळकर, पाटील यांचे नाव गाेवण्याचा प्रयत्न

अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवलं जातं, तशाच प्रकारचा निंदनीय प्रयत्न झाला. काहीही कारण नसताना रणजितसिंह निबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो. अशा बाबतीत मी कधीच पक्ष, जात, व्यक्ती आणि राजकारण पाहत नाही, असंही फडणविसांनी सांगितलं.

मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा प्रकार

जिथे लहान भगिनीचा विषय असतो तिकडे मी कोणतीही तडजोड करत नाही. मात्र, मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे प्रकार सुरु आहेत. चुकीच्या गोष्टीला मी कधीही पाठीशी घातलेले नाही आणि जर चुकीचे राजकारण करत असतील तर ते देखील सहन करणार नाही. त्याला उत्तर देणारा मी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

Web Title: Chief minister devendra fadnavis has responded to the suicide case in phaltan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Ranjeetsingh Naik Nimbalkar

संबंधित बातम्या

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा!
1

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा!

अकलूज बसस्थानकात अभूतपूर्व गर्दी; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गाड्या पाठविल्याने प्रवाशांची गैरसाेय
2

अकलूज बसस्थानकात अभूतपूर्व गर्दी; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गाड्या पाठविल्याने प्रवाशांची गैरसाेय

रुग्ण बेडवर अन् डॉक्टर सुट्टीवर; मांडवगण फराटा आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार
3

रुग्ण बेडवर अन् डॉक्टर सुट्टीवर; मांडवगण फराटा आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार

प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांमुळे बसणार फटका; शोधनिबंधाच्या अटीमुळे उमेदवार संतप्त
4

प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांमुळे बसणार फटका; शोधनिबंधाच्या अटीमुळे उमेदवार संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.