Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदूच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया, चिमुकल्याला मिळाले जीवनदान

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारामुळे आणि समाजातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण ६ लाख २० हजार रुपये इतकी मदत जमा झाली असून बाळावर यशस्वीरित्या मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 29, 2025 | 05:48 PM
मेंदूच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया, चिमुकल्याला मिळाले जीवनदान (फोटो सौजन्य-X)

मेंदूच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया, चिमुकल्याला मिळाले जीवनदान (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड गावातील एका वाहन चालक आणि गृहिणीच्या साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याला जन्मताच फिट्सचा त्रास होता. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. अशा प्रकारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारामुळे आणि समाजातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण ६ लाख २० हजार रुपये इतकी मदत जमा झाली असून बाळावर यशस्वीरित्या मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली. या बाळाला जन्मताच फिट्सचा त्रास सुरू झाला होता. शारीरिक हालचालींवर ताबा नसणे, वारंवार झटके येणे आणि बाळपणाच्या गोड क्षणांऐवजी रुग्णालयाच्या चकरा, औषधोपचार आणि वेदना हेच त्याच्या आयुष्याचे वास्तव झाले होते. डॉक्टरांनी ‘एपिलेप्सी सर्जरी’ हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. मात्र, ९ लाख ४७ हजार १०० रुपये इतका खर्च ऐकून बाळाच्या आई-वडिल अस्वस्थ झाले.

संतापजनक! पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य, पोलिसांनी…

एकूण ६ लाख २० हजार रुपयांची मदत

याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने बाळाच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने उपचारासाठी १ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून, साडे चार लाख रुपये धर्मादाय विभागातून आणि ६५ हजार रुपये स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मिळाले. अशा प्रकारे एकूण ६ लाख २० हजार रुपये इतकी मदत उभी राहिली. या मदतीच्या आधारावर मुंबईतील महालक्ष्मी येथील एस.आर.सी.सी. चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे बाळावर यशस्वीरित्या मेंदूची जटिल शस्त्रक्रिया पार पडली.

बाळाच्या मेंदूमध्ये व्हॅगस नर्व्ह स्टीम्युलेटर चीप

■ बाळाच्या मेंदूमध्ये हॅगस नर्व्ह स्टीम्युलेटर चीप बसवण्यात आली असून त्याच्या तब्येत आता सुधारते आहे.
■ त्याचे जीवन पुन्हा नव्या आशेने बहरत आहे. या छोट्या जीवाचा आणि त्याच्या पालकांचा संघर्ष मनाला भिडणारा होता. • बाळावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली याचा मनस्वी आनंद आहे, असे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पाहिलं ही भावना शब्दात मांडता येणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि कक्षातील सर्व लोक आमच्यासाठी देवदूतच ठरले.
■ त्यांनी आम्हाला या संकटातून बाहेर काढलं. हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, अशा शब्दांत बाळाच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Aditi Tatkare: आता राज्यातील महामार्गावर महिलांसाठी असणार स्वतंत्र स्वच्छतागृह, आदिती तटकरे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Chief minister devendra fadnavis is an angel for us the childs mother expresses gratitude

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Brain Surgery
  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
1

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
3

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
4

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.