Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांच्या सुरक्षेसाठी ‘खुली बात’! मिसिंग लिंक ट्रस्टचा मोठा पुढाकार; मुंबईतील १०० पालिकेच्या शाळांमध्ये AI…

मिसिंग लिंक ट्रस्टच्या मिसिंग अवेअरनेस अँड स्कूल सेफ्टी प्रोग्राम (एमएएसएसपी) या व्यापक प्रतिबंधात्मक उपक्रमाच्या पुढील टप्प्याच्या रूपात 'खुली बात'ची सुरुवात करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 02:35 AM
संवादातून होते बालसुरक्षेची सुरुवात

संवादातून होते बालसुरक्षेची सुरुवात

Follow Us
Follow Us:
  • संवादातून होते बालसुरक्षेची सुरुवात
  • एआय-सक्षम आणि व्हॉट्सॲपवर आधारित बालसुरक्षा चॅटबॉट सादर
  • खुली बात’ म्हणजे मोकळेपणाने केलेला संवाद
मुंबई:  बालसुरक्षेची सुरुवात संवादातून होते. एनसीआरबीच्या ‘क्राइम इन इंडिया 2024’ या अहवालानुसार, भारतात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत 69,191 प्रकरणांची नोंद झाली. यांपैकी 96%हून अधिक प्रकरणांमध्ये अनोळखी व्यक्तींऐवजी मुलांच्या जवळच्या परिचयातील व्यक्ती जबाबदार होत्या. मुलांना आणि तरुणांना वैयक्तिक मर्यादा, संमती आणि चांगले व सुरक्षित नातेसंबंध समजावून सांगणे, त्यांना अस्वस्थ करणाऱ्या परिस्थिती ओळखता येणे तसेच मदत कधी आणि कशी मागायची हे माहीत असणे, या बाबी अत्याचार रोखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे मुलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, योग्य प्रतिसाद देण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आवश्यक माहिती पालक, शिक्षक आणि काळजीवाहकांना असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अत्याचार रोखण्याला प्राधान्य देणारा हा दृष्टिकोन पुढे नेत मिसिंग लिंक ट्रस्टने (एमएलटी) आज कॅपजेमिनी इंडियाच्या सहकार्याने ‘खुली बात’हा एआय-सक्षम आणि व्हॉट्सॲपवर आधारित बालसुरक्षा चॅटबॉट सादर केला.’खुली बात’ म्हणजे मोकळेपणाने केलेला संवाद. पालक व काळजीवाहकांना बालसुरक्षेबाबत विश्वसनीय माहिती आणि मार्गदर्शन अधिक सहज उपलब्ध करून देण्यासाठी हा चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. आपल्या देखरेखीखाली असलेल्या मुलांशी वैयक्तिक मर्यादा, संमती, नातेसंबंध, ऑनलाइन सुरक्षा, अत्याचार आणि शोषण यांविषयी संवाद कसा साधायचा, याबाबत प्रौढांना या चॅटबॉटच्या माध्यमातून मदत मिळते. तसेच गरज भासल्यास योग्य मदत आणि आवश्यक साधनांची माहितीही यातून देण्यात येते. कोणत्याही प्रौढ व्यक्तीला व्हॉट्सॲपवर 6003060040 या क्रमांकावर ‘Hi’ असा मेसेज पाठवून या चॅटबॉटशी संवाद सुरू करता येतो.

महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव श्री. ब्रिजेश सिंह, आयपीएस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. मुंबईतील महानगरपालिकेच्या 100 शाळांमध्ये बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी मिसिंग लिंक ट्रस्ट काम करत आहे. या भागीदारीअंतर्गत तीन क्षेत्रांमध्ये काम करण्यात येत आहे. शाळांमधील कार्यक्रमांच्या माध्यमातून 10,000 किशोरवयीन मुला-मुलींना सुरक्षाविषयक शिक्षण देणे, पालक, शिक्षक आणि काळजीवाहूंसाठी एआय-सक्षम सुरक्षा चॅटबॉट म्हणून ‘खुली बात’ विकसित करणे आणि विविध संबंधित घटकांच्या परिषदा व चर्चांच्या माध्यमातून बालकांवरील लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठीची व्यवस्था अधिक सक्षम करणे यांचा त्यात समावेश आहे.

Buldhana News: पॉश कायदा; बुलढाणा जिल्ह्यातील १७ कार्यालयांना नोटीस, शासकीय व खाजगी ३६० कार्यालयांची तपासणी

मिसिंग लिंक ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त आणि सीईओ लीना केजरीवाल म्हणाल्या, “’खुली बात’मध्ये एआय मॉडेलच्या माध्यमातून केवळ सर्वसाधारण स्वरूपाचा सल्ला देण्यात येत नाही. गेल्या 10हून अधिक वर्षांपासून आम्ही प्रत्यक्ष क्षेत्रात केलेल्या कामाच्या अनुभवाच्या आधारे हा चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यातून मिळणारे मार्गदर्शन स्थानिक पातळीवरील प्रत्यक्ष जोखमींच्या स्वरूपावर आधारित असून भारतीय कुटुंबांना ज्या वास्तवाचा सामना करावा लागतो, त्याचाही संवेदनशीलपणे विचार करण्यात आला आहे. प्रत्येक उत्तर काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या माहितीच्या संग्रहावर आधारित आहे. ही माहिती संकलित करताना पूर्वग्रह, लिंगभाव आणि सत्तासंबंध यांचा जाणीवपूर्वक विचार करण्यात आला आहे. तसेच डिजिटल ॲक्सेस व साक्षरतेच्या विविध टप्प्यांवर असलेल्या प्रौढांनाही तो वापरता येईल, अशा प्रकारे या चॅटबॉटची रचना करण्यात आली आहे. केवळ माहिती देण्यापुरते हे मर्यादित नाही.

गरज भासल्यास कुटुंबांना त्यांच्या परिसरातील प्रत्यक्ष मदत आणि तक्रार नोंदवण्याच्या योग्य मार्गांशीही जोडण्यात येते. त्यामुळे प्रौढांना केवळ माहिती देणे हा यामागचा उद्देश नाही, तर त्यांच्या समोर घडत असलेली परिस्थिती समजून घेण्यास आणि त्यानुसार योग्य पाऊल उचलण्यास त्यांना मदत करणे हा उद्देश आहे.”

कॅपजेमिनी इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट आणि सीएसआर हेड कुमार अनुराग प्रताप म्हणाले, “मुले ऑनलाइन अधिक वेळ घालवत असल्यामुळे तंत्रज्ञानासोबत नव्या संधींबरोबरच नव्या प्रकारच्या जोखमीही निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा घटना रोखणे आणि संभाव्य धोके लवकर ओळखून योग्य पावले उचलणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. पालक आणि काळजीवाहू आधीपासून वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बालसुरक्षेविषयी विश्वसनीय माहिती आणि साधने त्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी ‘खुली बात’मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.”

Crime: निराधार महिलेचा आणि मुलीचा विनयभंग; त्यानंतर थेट…, आरोपीवर ॲट्रॉसिटी व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

मिसिंग लिंक ट्रस्टच्या मिसिंग अवेअरनेस अँड स्कूल सेफ्टी प्रोग्राम (एमएएसएसपी) या व्यापक प्रतिबंधात्मक उपक्रमाच्या पुढील टप्प्याच्या रूपात ‘खुली बात’ची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींना बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऑनलाइन सुरक्षा, वैयक्तिक मर्यादा, विश्वास संपादन करून गैरफायदा घेण्याचे प्रकार, अत्याचाराबद्दल सांगणे आणि मदत मागणे यांविषयी आवश्यक माहिती आणि कौशल्ये प्रदान करण्यात येतात. ‘खुली बात’च्या माध्यमातून ही व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आणि सुरक्षाविषयक शिक्षण, मोकळेपणाने संवाद साधणे आणि गरज भासल्यास लवकर मदत मागणे या गोष्टी बालपणातील दैनंदिन जीवनाचा भाग करण्याचे एमएलटीचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Child security missing link trust launch khuli bat ai chatbot in mumbao bmc 100 schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Mumbai News
  • POSCO Act

संबंधित बातम्या

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
1

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

AI Governance : ‘धमकीच्या कथा’ थांबवा! चीनचा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आग्रह; AI विकासावरून नवा वाद
2

AI Governance : ‘धमकीच्या कथा’ थांबवा! चीनचा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आग्रह; AI विकासावरून नवा वाद

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?
3

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?
4

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.