
सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
गणेशोत्सव संपल्यानंतर तातडीने आणि जलद गतीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सव संपून नवरात्रोत्सव सुरू झाला तरी प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पंचायत समिती सभापतींच्या गावातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने या प्रश्नाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे बाजारपेठ परिसरात धूळ, वाहतुकीची गैरसोय आणि नागरिकांना ये-जा करताना होणारा त्रास वाढला आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक संतप्त
कुडाळचा शाही दसरा आणि नवरात्रोत्सव लवकरच सुरू होत असून या उत्सवाला कुडाळ परिसरात मोठे महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात महिला व ग्रामस्थांकडून नऊ दिवस धार्मिक परंपरेनुसार अनवाणी प्रदक्षिणा घातली जाते. अशा परिस्थितीत रस्त्यावर धूळ, खडी, माती आणि अर्धवट कामामुळे निर्माण झालेली परिस्थिती नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर घालणारी ठरणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बाजारपेठ धुळीत; नागरिकांना मोठा त्रास
इंदिरानगर चौक ते बाजारपेठ मार्गे संभाजी महाराज चौक हा कुडाळमधील महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील काम अर्धवट राहिल्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांची वर्दळ सुरू असताना धुळीचे लोट उठत असल्याने दुकानदार आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सव कालावधीत बैठकीनंतर हे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले गेले होते. मात्र, आता १५ ऑक्टोबर पूर्वी या कामाला सुरुवात न केल्यास अधिकारी कर्मचारी यांना इकडे फिरकू दिले जाणार नाही असा इशारा कुडाळ मधील संतप्त बागरिकांनी दिला आहे.
ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त