Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara Drought: सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असला, तरी कराड तालुक्यातील मसूर पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 08, 2026 | 04:54 PM
Satara News, Wai Taluka, Congress, Drought, Agriculture, Farmers

Satara News, Wai Taluka, Congress, Drought, Agriculture, Farmers

Follow Us
Follow Us:

Satara Drought : पावसाअभावी पिके करपली असून विहिरींच्या पाण्याची पातळी खालावल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीची दखल घेऊन वाई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी वाई तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात कमिटीच्या वतीने बुधवारी, दि. ७ ऑक्टोबर रोजी वाईचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

कमी पावसामुळे उभी पिके करपली

तालुक्यात कमी पावसामुळे उभी पिके करपून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विहिरींमधील पाण्याची पातळीही तळाला गेल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाई तालुक्यात धोमसारखे मोठे धरण असतानाही त्याचे पाणी खंडाळा, फलटण, बारामती व कोरेगाव या भागांकडे जाते. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते

शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत वाईचा समावेश करण्यात आलेला नाही. तालुक्यातील परिस्थिती पाहता हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याची भूमिका काँग्रेस कमिटीने मांडली आहे. शासनाने वाई तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना वाई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पिसाळ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष जयदीप शिंदे, सातारा जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष प्रताप देशमुख, तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कराड तालुक्यातील मसूर पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असला, तरी कराड तालुक्यातील मसूर पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल

मसूर परिसरातील रिसवड, अंतवडी, गायकवाडवाडी, घोलपवाडी, हनबरवाडी, निगडी, खोडजाईवाडी, चिखली, किवळ, बानुगडेवाडी, गोसावेवाडी तसेच हेळगावचा पूर्व भाग नेहमीच पाणीटंचाईचा सामना करत असतो. पुणे-बंगळूर महामार्गालगतचा आणि नदीकाठचा परिसर हिरवागार दिसत असल्याने संपूर्ण भागातील परिस्थिती सारखीच असल्याचे गृहीत धरले जाते. परिणामी, डोंगराळ आणि कोरडवाहू भागातील गावांना दुष्काळी उपाययोजनांचा पुरेसा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

या भागातील काही गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागते. यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल राहिल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

Web Title: Satara congress demands wai taluka be declared drought affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
3

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.