Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Water Crisis: माण तालुक्याला ३१ गावे आणि २०० वाड्यांमधील ४५,७०२ लोकसंख्या बाधित झाली आहे. माण तालुक्यात ३८,९७२ पशुधन देखील बाधित असून तेथे १ शासकीय व २९ खाजगी अशा एकूण ३० टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे

  • By anuradha sagar
Updated On: Oct 08, 2026 | 05:04 PM
Satara News, Drought, Water Crisis, Water Tanker, Maan Taluka,

Satara News, Drought, Water Crisis, Water Tanker, Maan Taluka,

Follow Us
Follow Us:

Satara Water Crisis: जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील ३९ गावे आणि २३६ वाड्यांमधील ५४, २५७ नागरिक आणि ४१,१०७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकूण ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये १ शासकीय आणि ३४ खाजगी टँकरचा समावेश तसेच पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने १६ विहिरी आणि ९ बोअरवेलचे अधिग्रहित केले आहे.

माण तालुक्याला ३१ गावे आणि २०० वाड्यांमधील ४५,७०२ लोकसंख्या बाधित झाली आहे. माण तालुक्यात ३८,९७२ पशुधन देखील बाधित असून तेथे १ शासकीय व २९ खाजगी अशा एकूण ३० टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे, तसेच १० विहिरी आणि ६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या तालुक्यात दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड वर्तुळातील गावांना टँकरने पाणी दिले जात आहे.

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षने

४ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

खटाव तालुक्यातील ७ गावे आणि ३६ वाड्यांमधील ७,८३३ नागरिकांना ४ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. खटावमध्ये ६ विहिरी आणि ३ बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून मायणी, का. खटाव, बुध आणि कलेढोण परिसरातील गावांमध्ये पाण्याचे वाटप केले जात आहे. फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडळातील एका गावातील ७२२ नागरिकांसाठी १ खाजगी टँकर सुरू करण्यात आला आहे. सध्या प्रशासन टंचाईग्रस्त भागांत टँकरच्या फेऱ्या आणि विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असला, तरी कराड तालुक्यातील मसूर पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा

मसूर परिसरातील रिसवड, अंतवडी, गायकवाडवाडी, घोलपवाडी, हनबरवाडी, निगडी, खोडजाईवाडी, चिखली, किवळ, बानुगडेवाडी, गोसावेवाडी तसेच हेळगावचा पूर्व भाग नेहमीच पाणीटंचाईचा सामना करत असतो. पुणे-बंगळूर महामार्गालगतचा आणि नदीकाठचा परिसर हिरवागार दिसत असल्याने संपूर्ण भागातील परिस्थिती सारखीच असल्याचे गृहीत धरले जाते. परिणामी, डोंगराळ आणि कोरडवाहू भागातील गावांना दुष्काळी उपाययोजनांचा पुरेसा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

या भागातील काही गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागते. यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल राहिल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

Web Title: Satara water crisis 35 tankers deployed in maan khatav phaltan as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
1

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
3

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.