Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभाग बदलामुळे मतदारांत गोंधळ, हजारो मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात; नागरिक अन् उमेदवारांमध्ये नाराजी

चिखली, तळवडे, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरातील मोठ्या संख्येतील मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2025 | 01:55 PM
प्रभाग बदलामुळे मतदारांत गोंधळ, हजारो मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात; नागरिक अन् उमेदवारांमध्ये नाराजी

प्रभाग बदलामुळे मतदारांत गोंधळ, हजारो मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात; नागरिक अन् उमेदवारांमध्ये नाराजी

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रभाग बदलामुळे मतदारांत गोंधळ
  • हजारो मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात
  • नागरिक अन् उमेदवारांमध्ये नाराजी
पिंपरी : चिखली, तळवडे, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरातील मोठ्या संख्येतील मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारांना आपले नाव अपेक्षित प्रभागाऐवजी पूर्णपणे वेगळ्या प्रभागात असल्याचे दिसून आले.

चिखली प्रभाग क्रमांक १ मधील सुमारे साडेचार हजार मतदारांची नावे थेट प्रभाग क्रमांक ११ मध्ये टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे तळवडे येथील प्रभाग क्रमांक १२ मधील जवळपास १२०० मतदारांची नावे चिखली प्रभागात दाखल झाली आहेत. मतदार याद्या तपासताना हा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांसह संभाव्य इच्छुक उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांची नावेही याद्यांतून गायब झाल्याचे समोर येत असून, त्यामुळे निवडणूक तयारीसंदर्भात त्यांची मोठी अडचण झाली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभानिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात याद्यांतील बदलांमुळे तफावत वाढल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

विशेषत: ८० ते ९० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसमोर ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. चालणे-फिरणे कठीण असलेल्या या ज्येष्ठ मतदारांनी स्वतः हरकतीचे अर्ज घेऊन जाणे शक्य नसताना, अशा मोठ्या बदलांची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात जाणे, काहींची नावे यादीतूनच वगळली जाणे, या प्रकारामुळे प्रभागातील मतदारांसोबत इच्छुक उमेदवारांच्याही मनात संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. आगामी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदार यादीतील तफावत तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

“आम्ही दरवर्षी एकाच ठिकाणी मतदान करतो. पण आता नावच दुसऱ्या प्रभागात गेलं. वरिष्ठ नागरिकांना इतकं धावपळ करायला लावणं योग्य नाही.” — विठ्ठल जाधव, ज्येष्ठ नागरिक

Web Title: Citizens have alleged that thousands of voters names were put in the wrong ward

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Election News
  • Voter List Online

संबंधित बातम्या

Leopard : शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण
1

Leopard : शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका
2

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

कराडकरांनी निर्णयाचे स्वागत केले, यशवंत अन् लोकशाही आघाड्यांना बहुमत मिळेल; शंभूराज देसाईंचा विश्वास
3

कराडकरांनी निर्णयाचे स्वागत केले, यशवंत अन् लोकशाही आघाड्यांना बहुमत मिळेल; शंभूराज देसाईंचा विश्वास

टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात
4

टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.