Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांची उमेदवारी हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 01, 2026 | 01:18 PM
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

Follow Us
Follow Us:
  • निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी
  • नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव
  • पणे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय?
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय वातावरण काही काळासाठी शांत झाले. मात्र अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होताच, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांची उमेदवारी हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये आजी-माजी आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या पत्नी, मुले, सुना किंवा नातवंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय लढत न राहता, राजकीय घराण्यांच्या प्रभावाची चाचणी ठरत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

भोर तालुक्यात माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे भाजपकडून मैदानात असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे रिंगणात आहेत. शिरूरमध्ये माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याने स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे. जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सूनबाई कविता पवार यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले आहे.

दौंड तालुक्यात दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगदाळे यांचे पुत्र वीरधवल जगदाळे, तसेच माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. त्याच तालुक्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून राजकीय वारसदार रिंगणात उतरल्याने बहुरंगी लढती पाहायला मिळत आहेत.

इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत. मुळशी, आंबेगाव, खेड आणि हिंजवडी परिसरातही भावकी, जावई-सुना किंवा नातेवाईकांमध्ये थेट लढती होत असल्याचे चित्र आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीत पक्षनिष्ठेसोबतच घराणेशाही, स्थानिक ओळख आणि वैयक्तिक प्रभाव निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेची ही निवडणूक राजकीय नातेसंबंधांची कसोटी ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Web Title: Many people from political families are candidates in the pune zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Election News
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.