Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावरील मुलांच्या उत्थानासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! भीक मागणाऱ्या मुलांनाही आता…

रस्त्यावर काम करणारे आणि भीक मागणाऱ्या मुलांसाठी पुणे महापालिका सर्वसमावेशक प्रकल्प राबविणार आहे. या मुलांचे शिक्षण आणि आरोग्य या विषयावर या प्रकल्पात काम केले जाईल.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2026 | 12:25 PM
रस्त्यावरील मुलांच्या उत्थानासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! भीक मागणाऱ्या मुलांनाही आता...

रस्त्यावरील मुलांच्या उत्थानासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! भीक मागणाऱ्या मुलांनाही आता...

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यावरील मुलांसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय!
  • भीक मागणाऱ्या मुलांसाठीही ही योजना
  • दीड महिन्यात टप्प्याटप्प्याने राबविणार उपक्रम
पुणे : रस्त्यावर काम करणारे आणि भीक मागणाऱ्या मुलांसाठी पुणे महापालिका सर्वसमावेशक प्रकल्प राबविणार आहे. या मुलांचे शिक्षण आणि आरोग्य या विषयावर या प्रकल्पात काम केले जाईल. पुणे शहरातील प्रमुख चौक आणि सिग्नल परिसरात लहान मुले फुगे, रुमाल, पेन, विविध प्रकारची खेळणी आदी विक्री करतात. तर काही भीक मागतात असे चित्र आढळून येत आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे शिक्षण आणि आरोग्य याविषयावर काम करण्यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग हा प्रकल्प राबविणार आहे.

 

रस्त्यावर साहित्य विक्री करणाऱ्या लहान हातात कामाऐवजी शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून देण्यात आली आहे. शहरातील सिग्नल, चौक व गर्दीच्या ठिकाणी आढळणाऱ्या मुलांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणीद्वारे मुलांची ओळख, त्यांची पार्श्वभूमी व परिस्थिती समजून घेतली जाणार आहे, त्यामागे असलेले दबाव, शोषण व असुरक्षिततेवर नियंत्रण आणण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नोंदणी करून त्यांच्या शैक्षणिक पातळीप्रमाणे शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. कधीच शाळेत न गेलेली तसेच शिक्षण अर्धवट सोडलेली मुले यांच्यासाठी विशेष शिक्षण योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

दीड महिन्यात टप्प्याटप्प्याने राबविणार उपक्रम

या मुलांच्या शिक्षणासोबतच आरोग्याच्या बाबतीतही ठोस उपाययोजना करण्यात येणार असून, या मुलांची नियमित आरोग्य तपासणी, उपचार, लसीकरण व पोषणविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आजारमुक्त आणि सुरक्षित बालपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

तसेच, महापालिक’ घरट’ प्रकल्पाशी या मुलांना जोडून सुरक्षित निवारा, मार्गदर्शन आणि पुनर्वसनाची व्यवस्था केली जाणार आहे. तात्पुरत्या मदतीऐवजी दीर्घकालीन पुनर्वसन, शिक्षण आणि समाजात पुनर्स्थापना यावर भर देण्यात येणार आहे. हा उपक्रम टप्प्याटप्याने राबविण्यात येणार आहे.

Web Title: Pune municipal corporation has taken a big decision for children begging on the streets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.