Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन; शासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधला जाणार

पुणे शहरातील १२ मिसिंग लिंक रस्त्यांचे विकसनबाबत मिसिंग लिंकच्या कामांकरिता भूसंपादन, अतिक्रमण, मोजणी या अनुषंगाने अडचणी ठरत असणाऱ्या बाबींवर चर्चा करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2026 | 01:41 PM
पुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन; शासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधला जाणार

पुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन; शासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधला जाणार

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट 32 गावांतील प्रत्येकी एक अशा 32 रस्त्यांचे काम महापालिका प्राधान्याने करणार आहे. यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवली जाणार आहे. शहरासमोरील वाढती विविध स्वरूपाची शहरी आव्हाने प्रभावीपणे हाताळण्यासाठी तसेच विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी ‘शहर परिवर्तन समिती’ स्थापन करण्यात आली आहे.

पुणे शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक सुरळीत करणे अशा विविध प्रश्नांचा यात समावेश आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय विभागांमध्ये समन्वय वाढविणे, रस्ते चांगले करणे, शहर स्वच्छ आणि सुंदर करणे यावर उपाययोजनेबाबत शहर परिवर्तन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याची दुसरी बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली.

पुणे शहरातील १२ मिसिंग लिंक रस्त्यांचे विकसनबाबत मिसिंग लिंकच्या कामांकरिता भूसंपादन, अतिक्रमण, मोजणी या अनुषंगाने अडचणी ठरत असणाऱ्या बाबींवर चर्चा करण्यात आली असून, यामध्ये बाणेर-पाषाण लिंक रोड, वाकड ते कस्पटे वस्ती रोड, आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज रस्ता व वारजे येथील रोजरी स्कूल ते तिरुपती नगर येथील मिसिंग लिंकवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यामधील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणाऱ्या बाबींवर चर्चा झाली.

महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आर. पी. रस्त्यानुसार प्रत्येक गावनिहाय एक रस्ता याप्रमाणे ३२ गावांमधील पोलीस विभागांच्या समन्वयाने निश्चितीनुसार ३२ प्रमुख रस्त्याच्या विकसनाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत. सदर रस्त्यांमधील जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांचे मंजुरीसाठी सादर करण्याबाबत सूचित केले व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्त्यांसाठी ताब्यात आलेल्या जागांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

6 मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार

नागरिकांचे सोयीसाठी पुणे महापालिकेमार्फत ६ मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार करण्यात आले आहेत. नागरिकांनी त्यांचे रस्त्या संबंधित तक्रारीसाठी सदर ॲप्लिकेशन्सचा वापर करून तक्रार निवारण करण्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच पोलीस विभागामार्फत तयार करण्यात आलेले पीटीपी (पुणे सिटी ट्रॅफिक पोलिस ) हे ॲप्लिकेशन्स पुणे महानगरपालिकेच्या ६ मोबाईल ॲप्लिकेशन्सला लिंक झाल्यास एकत्रितपणे रस्ते व वाहतूक सुरळीत होणार याबाबत चर्चा झाली.

पावसाळ्यामुळे वॉटर लॉगिंगचे ठिकाणे निश्चित

पोलीस उपायुक्त वाहतूक यांनी रस्ते खोदाईबाबत ना हरकत (एनओसी) तात्काळ देण्यात येईल, असे सूचित करून परिपूर्ण माहिती असणारे अधिकारी यांनी त्यासाठी संपर्क केल्यास निर्णय घेणे सोयीचे होईल, असे सूचित केले. पुणे मनपामार्फत विविध रस्त्यांवर पावसाळ्यामुळे वॉटर लॉगिंगचे ठिकाणे निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार प्रत्येक परिमंडळ निहाय वॉटर लॉगिंग एरियासाठी टेंडर प्रकिया पूर्ण करून काम करून सुरू करणे येत आहे.

Pune Water Supply : पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा दिवसभर राहणार बंद

Web Title: City transformation committee established in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Development Work
  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
2

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
3

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
4

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.