Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke: टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली? अभिजीत दिपकेंच्या घरी डॉक्टरांचं पथक दाखल; नेमकं काय झालं?

Abhijeet Dipke: दिल्लीतील आंदोलन संपवून छत्रपती संभाजीनगरात परतलेल्या CJP संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली. नागरिकांना भेटत असताना त्यांना अस्वस्थ वाटून उलटी झाली. त्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून तपासणी सुरू असून, वडील भगवान दिपके यांनी यास दुजोरा दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 03:28 PM
टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली? अभिजीत दिपकेंच्या घरी डॉक्टरांचं पथक दाखल; नेमकं काय झालं?

टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली? अभिजीत दिपकेंच्या घरी डॉक्टरांचं पथक दाखल; नेमकं काय झालं?

Follow Us
Follow Us:
  • CJP संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली
  • डॉक्टरांकडून तपासणी सुरू
  • टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली?
 

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती शनिवारी (1 ऑगस्ट) अचानक बिघडली. दिल्लीतील आंदोलन संपवून महाराष्ट्रात परतल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील घरी नागरिक आणि समर्थकांची भेट घेत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उलटी झाली असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत आहे.

लोकांना भेटत असताना प्रकृती खालावली

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे 11.45 वाजता अभिजीत दिपके आपल्या घराच्या पार्किंगमध्ये समर्थकांना भेटण्यासाठी आले होते. भेटीदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ते घराच्या मागील बाजूस गेले, जिथे त्यांना उलटी झाली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद न साधता घरात विश्रांती घेतली.

वडिलांनी दिली माहिती…

या घटनेची पुष्टी करताना अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत.

‘राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही’; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा, ‘काही लोक त्यांना बळजबरीने…’

दिल्ली आंदोलनानंतर महाराष्ट्रात पुनरागमन

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 29 जुलै रोजी अभिजीत दिपके महाराष्ट्रात परतले होते. सुमारे 40 दिवसांच्या आंदोलनानंतर घरी परतलेल्या दिपके यांचे विमानतळावर कुटुंबीय आणि समर्थकांनी भावनिक स्वागत केले होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना मिठी मारत स्वागत केले होते.

यापूर्वी झाला होता टायफॉईड

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान 25 जुलै रोजी अभिजीत दिपके यांनी स्वतःला टायफॉईड झाल्याची माहिती दिली होती. काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसून उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. तरीही त्यांनी आंदोलनात सहभाग कायम ठेवला होता.

अभिजीत दिपके कोण?

अवघ्या 30 वर्षीय अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली आहे. देशातील Gen Z पिढीच्या आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळे ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. अलीकडेच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत त्यांचे आभारही मानले होते.

‘दिपकेंची जात आडवी आली का?’ तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Web Title: Cjp founder abhijeet dipke falls ill after returning to maharashtra doctors examine him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Cockroach Janata Party

संबंधित बातम्या

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
1

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा
2

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
3

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.