Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट, कठोर निर्णयांची अंमलबजावणी

राजवाडा चौपाटीचा वाद वाढत चालला आहे. येथील अस्वच्छेमुळे आता शिस्तीसाठी मोठं पाऊल उचललं आहे. यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली असून ती नक्की काय आहे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 27, 2026 | 10:15 PM
राजवाडा चौपाटीसाठी नवे नियम

राजवाडा चौपाटीसाठी नवे नियम

Follow Us
Follow Us:
  • राजवाडा चौपाटीवरील अस्वच्छता 
  • नियमावलीचे नवे पाऊल
  • काय आहे नक्की नियमावली 
सातारा: सातारामधील राजवाडा चौपाटी परिसरातील वाढत्या वादविवाद आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर येथील व्यावसायिकांनी एकत्र येत शिस्त आणि स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलली आहेत. ग्राहकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी सर्वांनी एकमताने नियमावली तयार केली असून ती नगर परिषदेकडे सादर करण्यात आली आहे.

या नव्या उपक्रमानुसार, चौपाटी परिसरात कोणत्याही प्रकारचे वाद, गोंधळ किंवा अनुशासनभंग सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर सामूहिक कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास संबंधितांचा व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णयही अमलात आणला जाणार आहे.

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; साताऱ्यात संघटनांचे तीव्र आंदोलन

कचरा व्यवस्थापनेबाबत काळजी 

स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेत कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. उरलेले अन्न, प्लास्टिक किंवा इतर कचरा परिसरात न टाकता योग्य ठिकाणीच टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, पाण्याचा वापर नियंत्रित पद्धतीने करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दर आठवड्याला एक दिवस संपूर्ण चौपाटीची स्वच्छता मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

काय आहे मुख्य नियम

मद्यपानास पूर्ण बंदी, तसेच सध्याच्या गाड्यांव्यतिरिक्त नवीन गाड्यांना प्रवेश न देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे.

नगरपालिकेच्या सूचनांचे पालन करत, दंडात्मक कारवाई स्वीकारण्याची तयारीही व्यावसायिकांनी दर्शवली आहे. या पुढाकारामुळे चौपाटी परिसर अधिक सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी आकर्षक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निसर्गप्रेमींनो डोळस व्हा! सर्वांचं खास आकर्षण असणारं कास होतंय भकास, पर्यावरण वाचवण्याची गरज

ठळक निर्णय काय आहेत?

  • चौपाटीवर वादविवादास पूर्ण बंद
  • कचरा व्यवस्थापनासाठी कडक नियम
  • आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम
  • मद्यपानास सक्त मनाई
  • नवीन गाड्यांना परवानगी नाही
  • नियमभंग केल्यास दंड व कारवाई
याशिवाय राजवाडी चौपाटीच्या या भागात परप्रांतीयांचा वेढाही वाढला असल्याचे दिसून आले आहे आणि अनेक जण प्रशासनाने यावर कारवाई करावी यासाठी प्रयत्न करत आहेत. तर सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी याप्रकरणी असंच वातावरण राहिलं तर राजवाडा चौपाटी कायमची बंद करण्यात येईल असा इशारा दिला असल्याचं आता समोर आलं आहे. छुप्या राजकीय पाठिंब्यांमुळेच हे सर्व चालू असल्याचीही आता चर्चा होत आहे. त्यामुळे हे सर्व वेळीच बंद करण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत.

Web Title: Cleanliness and discipline code implemented at rajwada choupati traders unite to enforce strict measures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:14 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi Batmya
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
2

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
3

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
4

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.