Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवामान बदलाचा मासळी बाजाराला बसतोय फटका; अनेक बोटी रिकाम्या हातीच परतल्या

सध्या समुद्रात खूप दूरवर जाऊन सुद्धा मासे मिळत नाहीत. त्यामुळे इंधन खर्च व मेहनत वाया जात असल्याने गेल्या आठ-दहा दिवसांपासून आम्ही मासेमारीला जात नसल्याचे एक मच्छिमाराने सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 02, 2025 | 07:35 AM
हवामान बदलाचा मासळी बाजाराला बसतोय फटका; अनेक बोटी रिकाम्या हातीच परतल्या

हवामान बदलाचा मासळी बाजाराला बसतोय फटका; अनेक बोटी रिकाम्या हातीच परतल्या

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण होत असल्याने, तर कधी पाऊस कधी उकाडा, यामुळे माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेक बोटी गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात जात नसल्याने माशांचा तुटवडा जाणवत आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी, दांडी, अर्नाळा, डहाणू खाडी, उंबरगाव येथील समुद्रकिनाऱ्यावर मासे कमी मिळत असल्याने अनेक बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत.

मासेमारीसाठी सध्या खूप लांब जावे लागत असल्याने आणि मासे मिळत नसल्याने मच्छिमारांवर मोठे आर्थिक संकट ओढवलेले आहे. त्यामुळे अनेक जण खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळत आहेत. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून खराब वातावरणामुळे अनेक ठिकाणी पाऊस व वातावरण बदल होत आहे. कधी थंडी पडते तर कधी कडक उन असल्याने मासे कमी झाले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर बोटी लावून अनेक मच्छीमार जाळी दुरुस्तीच्या इतर कामांना देखील लागले आहेत.

सध्या समुद्रात खूप दूरवर जाऊन सुद्धा मासे मिळत नाहीत. त्यामुळे इंधन खर्च व मेहनत वाया जात असल्याने गेल्या आठ-दहा दिवसांपासून आम्ही मासेमारीला जात नसल्याचे एक मच्छिमाराने सांगितले.

अनेक ठिकाणी मासळी बाजार सुनेसुने

पालघर जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मच्छी विक्रेते राहत असून गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक बोटी समुद्रात न गेल्याने अनेक मच्छी मार्केट, बाजार सुनेसुने झाले आहेत. तर खाडीतील लहान मासे सध्या विक्रीस दिसत आहेत. डहाणूमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. सध्या अनेक दिवसांपासून समुद्रकिनाऱ्यांवर बोटी उभ्या असून आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत.

अनेक व्यवहार झालेत बंद

या भागातील मासेमारीवर अनेक नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यात बोटींवर काम करणारे खलाशी मासे वाहतूक करणारे, त्याचबरोबर माशांचा बाजार भरल्यानंतर छोट्या-मोठ्या टोपल्यांमध्ये गावोगावी मासे विक्री करणारे अशा अनेक लोकांचा रोजगार चालत असतो. पण गेल्या दहा दिवसापासून हे सगळे व्यवहार बंद झाले आहेत.

आमच्या हाताला आता काम नाही

गेल्या अनेक दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने समुद्रात बोटी जात नसल्याने आम्हालाही काम नाही. त्यामुळे खराब झालेली, तुटलेली जाळी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. खोल समुद्रात जाऊन इंधन व मेहनत वाया जाते मासे मोठ्या प्रमाणात लागत नसल्याने शक्यतो गेल्या काही दिवसापासून आम्ही समुद्रात जात नाहीत, असेही एक मच्छिमाराने सांगितले.

Web Title: Climate change is affesting on fish market nkra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 07:24 AM

Topics:  

  • Climate Change
  • Fish market

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
2

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
3

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.