Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

कोकणात पावसाचा अंदाज असून, विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात हवामान काहीसे अस्थिर राहण्याची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2026 | 08:17 AM
कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल 
  • विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
  • सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातही पावसाचा अंदाज
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. राज्यातील अनेक भागांत ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच मान्सून आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. असे असताना कोकणसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

कोकणात पावसाचा अंदाज असून, विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात हवामान काहीसे अस्थिर राहण्याची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरण बदलण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, दुसरीकडे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. सध्या राज्यात याच ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवू लागला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वाळू उपशाला लगाम ! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

दरम्यान, ऊनाचा कडाका तर पावसाची शक्यता त्यामुळे आता पुढील काही दिवसांतही हवामानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

कोल्हापुरातही विजांसह पावसाची शक्यता

कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. राज्यातील उर्वरित भागात मात्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

तापमान वाढीची नोंद

सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आता उन्हाचा चटका अधिक जाणवू शकतो. त्यासोबतच वातावरणातील उकाडाही वाढण्याची शक्यता आहे.

पुणे शहराला ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुणे शहरात उष्णतेचा चटका तीव्रतेने जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल  आणि किमान तापमानात सातत्याने वाढ होत असून, पुणेकरांना आता ‘ऑक्टोबर हिट’चा थेट सामना करावा लागत आहे. सोमवारी (५ ऑक्टोबर) शहरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

Web Title: Rain accompanied by lightning strike is likely in some parts of maharashtra including konkan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • Rain News

संबंधित बातम्या

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
1

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
2

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.