Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांचा गेम होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

CM Devendra Fadnavis: गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 10, 2025 | 07:29 PM
गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांचा गेम होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांचा गेम होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

मंत्री झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
अवैध मार्गाने राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी सुपारी
गुन्हेगारी साखळीला रोखण्यासाठी मकोका लागू होणार

मुंबई: गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात केली असून यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) कारवाईसाठी बळकटी येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. याबद्दल मंत्री झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

परराज्यातून अवैध मार्गाने राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी सुपारी आणली जाते. यावर ‘ एफडीए’च्या जप्ती आणि फौजदारी कारवाईनंतरही विक्री होत असल्याने या गुन्हेगारी साखळीला रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) अंतर्गत कारवाईचा निर्णय घेण्याची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पातळीवर सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मकोका कारवाई करण्याची घोषणा करून विभागाच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे, असे मंत्री झिरवाळ म्हणाले.

मकोका कारवाईची घोषणा करताना “गुटखा व अंमली पदार्थांवरील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर विशेष कायदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला जाईल,”असे मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ अधिवेशनात स्पष्ट केले.

गुटखा उत्पादन व विक्रेत्यांवर मकोका लावण्याबाबत लवकरच निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मानले आभार
नागपूर – परराज्यातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी सुपारी आणली जाते. या पार्श्वभूमीवर जप्ती आणि फौजदारी कारवाईनंतरही विक्री होत… pic.twitter.com/q6UHrva4gp — Narhari Zirwal (@Narhari_Zirwal) December 9, 2025

गुटखा, सुगंधी पान मसाला यावर राज्यात बंदी असूनही शाळा महाविद्यालयांच्या व परिसरातील दुकानांत गुटखा उत्पादन व विक्रेत्यांकडून नियमबाह्य विक्री केली जाते. गुटखा विक्री कारवाई अधीक प्रभावी व्हावी यासाठी गुटख्यासह सुगंधी सुपारी विक्रेत्यांनाही मकोकाच्या कक्षेत आणले जाणार आहे, तसा प्रस्तावच विधि व न्याय विभागाला पाठवणार असल्याची माहिती या पूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.

Web Title: Cm devendra fadnavis announcedthe imposition of mcoca act on gutkha manufacturers and sellers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • MCOCA Action
  • Narhari Zirval
  • Paan Masala

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: फडणवीस सरकारची अडचण वाढणार? अण्णा हजारे आमरण उपोषण करणार, कारण काय?
1

Maharashtra Politics: फडणवीस सरकारची अडचण वाढणार? अण्णा हजारे आमरण उपोषण करणार, कारण काय?

प्रवास सुखकर होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ महामार्गाच्या सुधारित आखणीस दिली मान्यता
2

प्रवास सुखकर होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ महामार्गाच्या सुधारित आखणीस दिली मान्यता

आता गुटखा विक्री कराल तर खबरदार…! राज्य सरकारकडून केली जाणार ‘ही’ मोठी कारवाई
3

आता गुटखा विक्री कराल तर खबरदार…! राज्य सरकारकडून केली जाणार ‘ही’ मोठी कारवाई

Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले…
4

Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.