Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Exam : भविष्यात MPSC ची मोठी भरती, परीक्षांसंदर्भातही CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असं आश्ववासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 19, 2025 | 04:01 PM
भविष्यात MPSC ची मोठी भरती, परीक्षांसंदर्भातही CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

भविष्यात MPSC ची मोठी भरती, परीक्षांसंदर्भातही CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

Follow Us
Follow Us:

युपीएससीच्या धर्तीवर राज्यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदारसह इतर पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, एमपीएससीची दिरंगाई आणि अधिकाऱ्यांमधील ताळमेळ, परीक्षांनंतर निकाल आणि नियुक्तीलाही एमपीएसीकडून तत्परता दिसून येत नसल्याचा आरोप होत असतो. याबाबत राज्यातील आमदार शिवाजीराव गर्जे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत महत्त्वाची घोषणा केली आहे. भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असं आश्ववासन त्यांनी दिलं आहे.

नव्याने समाविष्ठ बत्तीस गावांसाठी पुणे महापालिकेने दिले काय? विधीमंडळात विचारण्यात आला प्रश्न

युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरीत दोन जागांसाठी जाहीरात देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशी माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली.

सर्व राज्यांचा आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशात वर्ग ए दोन आणि तीन देखील आपण एमपीएससीला दिलेलं आहे. त्यातूनच, आपण एमपीएससीचं रिस्ट्रक्चरिंग करत आहोत. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, अशात आपण त्यांच्यासोबत बोलणी करुन, त्यांचं ऐकून काही गोष्टी करत आहोत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.

आमदार विक्रम काळे यांनी, MPSC मध्ये मनुष्यबळ कमी असल्याने स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकिया पूर्ण होऊनही उमेदवारांचे पोस्टिंग होत नाही. याशिवाय पोस्टिंग देण्यासाठी काही व्यवहार होतात, असा आरोप केला होता. त्यावरही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं.

‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’बाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश; आता…

एमपीएससीची सर्वच पदं लवकर भरली गेली पाहिजे हा प्रयत्न असतो. सध्या तीन पदे रिक्त आहेत, ती आपण तात्काळ भरतोय. पूर्ण रिस्ट्रकचर करत आहोत. भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रकिया राबवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात दिली. तसेच, परिक्षेचा निकाल आला तेव्हापासून आपण वेगाने काम केलं, तरी देखील मी मान्य करतो की अजून वेगाने काम करू, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Cm devendra fadnavis big announcement regarding mpsc recruitment and descriptive exams like upsc latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • MPSC Exams
  • MPSC Recruitment
  • UPSC Result

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.