Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 22, 2026 | 02:35 AM
“… यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी”; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
Follow Us
Follow Us:

दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त kएलि जाणार
पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देण्याचे निर्देश
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक

मुंबई: आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांची माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील ९५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालखी मार्गावरील विश्रामस्थळ सुविधेसंदर्भात बैठक.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पालखी मार्ग पर विश्रामस्थल की सुविधा के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर… pic.twitter.com/s7dGUM7cfw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2026

या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी AI चा…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकरी भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना आणखी कोणत्या सुविधा हव्यात त्या करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरुपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षी हँगरची व्यवस्था करण्यात आली होती, त्या प्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत.

पुलकुंडवार म्हणाले की, पालखी मार्गावरील विकास कामे पूर्ण करण्यात येत असून यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी दोन्ही पालखी मार्गावर ३७०० मोबाईल शौचालये पुरविण्यात आली होती. यंदा ५ हजार मोबाईल शौचालये पुरविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Devendra Fadnavis Meeting: राज्यातील धर्मांतर आणि ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदणार! मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन, सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री महोदय यांचे सचिव राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Cm devendra fadnavis directed that work on pandharpur development plan be expedited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • CM Devendra Fadnavis
  • pandharpur wari

संबंधित बातम्या

Alibag Ashadhi Ekadashi Wari: अलिबागमध्ये ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ संकल्पनेतून भव्य दिंडी; पालखी सोहळ्यात विठ्ठलनामाचा गजर
1

Alibag Ashadhi Ekadashi Wari: अलिबागमध्ये ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ संकल्पनेतून भव्य दिंडी; पालखी सोहळ्यात विठ्ठलनामाचा गजर

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Ashadhi Wari 2026: वारीत फुगडी खेळल्यानंतर वारकरी एकमेकांच्या पाया का पडतात? जाणून घ्या आध्यात्मिक कारण
3

Ashadhi Wari 2026: वारीत फुगडी खेळल्यानंतर वारकरी एकमेकांच्या पाया का पडतात? जाणून घ्या आध्यात्मिक कारण

माऊली भेटली सोपाना; आनंद वैष्णवांना! मुख्यमंत्र्यांचा सहभाग; लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने बंधूभेट सोहळा
4

माऊली भेटली सोपाना; आनंद वैष्णवांना! मुख्यमंत्र्यांचा सहभाग; लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने बंधूभेट सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.