Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manikrao Kokate: कोकाटेंच्या “शासन भिकारी” वक्तव्यावर फडणवीस नाराज; म्हणाले, “असं विधान केले असल्यास…”

Maharashtra Politics: मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही, असे स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 22, 2025 | 03:22 PM
Manikrao Kokate: कोकाटेंच्या "शासन भिकारी" वक्तव्यावर फडणवीस नाराज; म्हणाले, "असं विधान केले असल्यास..."

Manikrao Kokate: कोकाटेंच्या "शासन भिकारी" वक्तव्यावर फडणवीस नाराज; म्हणाले, "असं विधान केले असल्यास..."

Follow Us
Follow Us:

गडचिरोली:  CM Devendra Fadnavis:  सध्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर मी जाहिरात स्किप करत होतो असे स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिले होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. दरम्यान यावर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांना प्रत्युत्तर दिले. तेव्हा त्यांनी शेतकरी भिकारी नसून शासन भिकारी आहे एक विधान केले आहे. आता यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचे कान टोचले आहेत.

काय म्हणाले होते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे?

मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला. नाही. आजतागायत मी राम्मी खेळलो नाही तरी माझी बदनामी केली जात आहे. ज्या नेत्यांनी बदनामी केली त्या सर्वांना मी कोर्टात खेचणार आहे.

शेकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते. शेतकरयांना अजूम्ही एक रुपया देत नाही. म्हणजे शासन भिकारी आहे. शेतकरी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. पीक विम्यामुळे महाराष्ट्रात ५ ते साडे पाच लाख बोगस अर्ज साडपले आहेत. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले. पुढील सहा महिन्यात कृषिक्षेत्रात मोठा बदल झालेला दिसून येईल.

Manikrao Kokate: “…माझा राजीनामा देईन”, विधीमंडळातील रमीच्या डावावर कृषीमंत्री कोकाटे काय म्हणाले?

मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंना सुनावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शासन भिकारी आहे शेतकरी नाही या विधानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कोकाटे नेमके काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही. तथापि त्यांनी असं विधान केले असेल तर एखाद्या मंत्र्याने असे विधान करणे चुकीचे आहे. पीकविमा पद्धत बदलण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतलेला आहे.

नेमके प्रकरण काय?

विधानसभेच्या अधिवेशनानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सभागृहात लक्षवेधी सुरू असताना कोकाटे मोबाईलवर पत्ते (ऑनलाइन रमी) खेळताना दिसत असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन कोकाटे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच विरोधांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरून कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली.

🕑 2.10pm | 22-7-2025📍Gadchiroli. LIVE | Media Interaction#Maharashtra #Gadchiroli https://t.co/Y1V8LCJSgk — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2025

माणिकराव कोकाटे म्हणाले, ” राजीनामा देण्यासारखे घडलं काय? मी काही विनयभंग केला का ? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? मी मुख्यमंत्री यांना ब्रिफ केलेलं नाही. चौकशी झाली नाही त्यामुळे समज होणे साहजिकच आहे. रम्मी खेळलो नाही आणि खेळत नाही. मला नियमांची काळजी आहे. हा विषय अनावश्यक लावून धरले आहे. मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत, असं यावेळी कोकाटेंनी सांगितले.

Web Title: Cm devendra fadnavis disagree with manikrao kokate government beggar statement online rummy maharashtra politics gadchiroli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
1

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन
2

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
3

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
4

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.